औरंगाबाद जिल्ह्यात ५ ठार
By Admin | Published: May 13, 2014 03:50 AM2014-05-13T03:50:55+5:302014-05-13T03:50:55+5:30
जिल्ह्यात सोमवारी झालेल्या चार वेगवेगळ्या अपघातांत पाच ठार तर पाच जण जखमी झाले. मृतांमध्ये औरंगाबाद एमआयटी कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांचा आणि उल्कानगरी, औरंगाबाद येथील एका तरुणाचा समावेश आहे.
औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी झालेल्या चार वेगवेगळ्या अपघातांत पाच ठार तर पाच जण जखमी झाले. मृतांमध्ये औरंगाबाद एमआयटी कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांचा आणि उल्कानगरी, औरंगाबाद येथील एका तरुणाचा समावेश आहे. याशिवाय पाचोडनजीक एक महिला व फर्दापूर येथे प्रत्येकी एक असे दोघे ठार झाले. एमआयटीचे दोन विद्यार्थी ठार दौलताबाद येथील बसस्थानक चौकात दुचाकी दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात औरंगाबादच्या एमआयटी कॉलेजचे दोन विद्यार्थी जागीच ठार, तर अन्य एक जखमी झाला. सुटी असल्याने हे तिघे दुचाकीवरून वॉटर पार्कमध्ये आले होते. रात्री ११.३०च्या सुमारास तेथून औरंगाबादकडे परतत असताना दौलताबाद येथील मुख्य चौकात दुचाकी दुभाजकावर आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की, दुचाकीच्या समोरच्या भागाचा चुराडा झाला आणि दुचाकीस्वार १०-१५ फूट लांब फेकले गेले. या अपघातात गुलशनप्रसाद सुरेश प्रसादसिंग (२३, रा. केरिया, बिंदियापूर, ता. श्रीपूर, जि. बेगुसराय) व अर्जुनसिंग त्रिवेणीसिंग (२३, रा. मुर्दा चौक, ता. जि. पूर्व चंपारण्य) यांचे निधन झाले, तर कुलदीपकुमार कणकचंद दास (३०, रा. प्रगतीनगर, भास्करपेठ, नानमती, आसाम) हा गंभीर जखमी झाला.