दोन बसच्या धडकेत पाच ठार

By Admin | Published: December 24, 2016 04:24 AM2016-12-24T04:24:58+5:302016-12-24T04:24:58+5:30

सोलापूर-हैदराबाद महामार्गावरील येणेगूर गावानजीक शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास महाराष्ट्र व कर्नाटक

Five killed in a bus crash | दोन बसच्या धडकेत पाच ठार

दोन बसच्या धडकेत पाच ठार

googlenewsNext

येणेगूर (जि. उस्मानाबाद) : सोलापूर-हैदराबाद महामार्गावरील येणेगूर गावानजीक शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास महाराष्ट्र व कर्नाटक महामंडळाच्या बसची समोरासमोर धडक होऊन पाच जणांचा जागीच मृत्यू तर, अन्य २६ जण जखमी झाले. मृतांमध्ये दोन्ही बसच्या चालकांचा समावेश आहे.
इंदापूर (जि. पुणे) आगाराची उमरगा-पुणे ही बस आणि कर्नाटकातील आळंद आगाराची तुळजापूर-गाणगापूर बस यांची समोरासमोर जोराची धडक बसली. लक्ष्मण दत्तात्रय म्हेत्रे (३४, उमरगा-पुणे बसचे चालक), प्रवासी वामन मारुती साळुंके (४३) व शिवाजी मारुती साळुंके (४०), राहुल रमाकांत कटारे (३१) आणि आंबराया शिवराया तेलाकुने (३४, तुळजापूर-गाणगापूर बसचे चालक) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात २६ जखमी झाले. त्यापैकी चार जखमींवर जळकोट, एकावर उमरगा तर इतर जखमींना उपचारासाठी सोलापूरला हलवले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Five killed in a bus crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.