महिला हेल्पलाइनवर सव्वा लाख कॉल्स
By admin | Published: November 20, 2015 01:24 AM2015-11-20T01:24:39+5:302015-11-20T01:24:39+5:30
महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुरू करण्यात आलेल्या महिला हेल्पलाइनवर गेल्या १० महिन्यांत तब्बल सव्वा लाख कॉल्स आले. यातील १९ हजार ९८२ तक्रारी दूर करण्यात आल्या आहेत.
मुंबई : महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुरू करण्यात आलेल्या महिला हेल्पलाइनवर गेल्या १० महिन्यांत तब्बल सव्वा लाख कॉल्स आले. यातील १९ हजार ९८२ तक्रारी दूर करण्यात आल्या आहेत.
दर दोन मिनिटांनी हा हेल्पलाइन क्रमांक खणखणत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांच्या मार्गदर्शनाखाली या हेल्पलाइनचे कामकाज सुरू आहे.
गेल्या १० महिन्यांत या हेल्पलाइनवर तब्बल १ लाख २४ हजार ५३३ कॉल्स आले आहेत. यापैकी १९ हजार ९८२ कॉल्सनुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. तरुण छेड काढत आहे, नवरा मारतो, सासूने घराबाहेर काढले, डांबून ठेवले.. अशा प्रकारच्या तक्रारींसह घरात पाणी नाही आले, रस्ता बंद आहे का? मेगा ब्लॉक कधी संपणार? अशा स्वरूपाचे कॉल्स या हेल्पलाइनवर येत आहेत. यापैकी ४० टक्के कॉल्स गंभीर असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
गुन्ह्यांना आळा
बलात्कार, सामूहिक बलात्कार, अपहरण, हुंडाबळी, विनयभंग, छेडछाड अशा गुन्ह्यांच्या वाढत्या आकडेवारीमुळे महिलांच्या सुरक्षेसाठी मुंबईत अनेक उपक्रम, योजना राबविण्यात येत आहेत. शहरातील महिला अधिक सुरक्षित राहाव्यात यासाठी मुंबई पोलिसांनी २८ फेब्रुवारी २००८मध्ये १०३ हा हेल्पलाईन क्रमांक सुरू केला होता.
कॉल्सची आकडेवारी
(१३ आॅक्टोबर २०१५पर्यंत)
महिना आलेले कॉल्सकारवाई
जानेवारी१६,१७८१४३९
फेब्रुवारी१३,६७६२१८८
मार्च१५,५९२१९७८
एप्रिल१७,९११२०८२
मे१५,००७२६१२
जून९१४१२२४५
जुलै१५,३३३२१९३
आॅगस्ट९८०८१९२८
सप्टेंबर९५७८२२८९
आॅक्टोबर२३,०९१०२८