विवाहासाठी पाच लाख काढता येणार
By admin | Published: November 17, 2016 03:58 AM2016-11-17T03:58:35+5:302016-11-17T03:58:35+5:30
ऐपतीपेक्षा जास्त पैसा बाळगणाऱ्यांनाच हा काळ अडचणीचा आहे. सर्वसामान्यांना काहीही अडचण नाही. विशेष म्हणजे, लग्न समारंभासाठी आता ५ लाख रुपयांपर्यंत रक्कम
लातूर : ऐपतीपेक्षा जास्त पैसा बाळगणाऱ्यांनाच हा काळ अडचणीचा आहे. सर्वसामान्यांना काहीही अडचण नाही. विशेष म्हणजे, लग्न समारंभासाठी आता ५ लाख रुपयांपर्यंत रक्कम काढता येईल, असे स्टेट बँक आॅफ हैदराबादचे मुख्य व्यवस्थापक गणेश वाघमारे यांनी बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
गणेश वाघमारे म्हणाले, लग्नपत्रिका आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांची परवानगी असेल तर बँकेकडून खातेदारांना ५ लाखांची रक्कम आपल्या खात्यावरून काढता येईल. त्यासाठी केवळ या दोन पुराव्यांची गरज आहे. लग्नकार्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
दुसऱ्याचाच पैसा बँकेत जमा करण्यासाठी गर्दी होतेय, असा संशय आहे. त्यामुळे आता बोटाला शाई लावण्याचा प्रयोग हाती घेतला आहे. एकदा भरल्यानंतर पुन्हा त्याला पैसा जमा करता येणार नाहीत. शिवाय, त्याचा भरणा तपासला जाईल. वारंवार बँकेत येणाऱ्यांची यामुळे गर्दी कमी होणार आहे, असेही ते म्हणाले.