पाच मोठय़ा तीर्थक्षेत्रंचा वर्षभरात विकास
By admin | Published: July 8, 2014 01:15 AM2014-07-08T01:15:33+5:302014-07-08T01:15:33+5:30
पंढरपूर आणि अमरावती जिल्ह्यातील मोझरी तीर्थक्षेत्रंच्या विकास आराखडय़ातील कामे कोणत्याही परिस्थितीत जून 2क्15 र्पयत पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज दिले.
Next
मुंबई : आषाढी एकादशीच्या पाश्र्वभूमीवर श्री क्षेत्र देहू, आळंदी, शेगाव, पंढरपूर आणि अमरावती जिल्ह्यातील मोझरी तीर्थक्षेत्रंच्या विकास आराखडय़ातील कामे कोणत्याही परिस्थितीत जून 2क्15 र्पयत पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज दिले.
राज्यातील तीर्थक्षेत्रंच्या विकास आराखडा आढाव्यास मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर झाली. सार्वजनिक बांधकाम मंत्नी छगन भुजबळ, कृषिमंत्नी राधाकृष्ण विखे पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्नी दिलीप सोपल, जलसंपदा मंत्नी हसन मुश्रीफ, पर्यावरण मंत्नी संजय देवतळे, आमदार यशोमती ठाकूर, डॉ. संजय कुटे आदी या वेळी उपस्थित होते.
देहू, आळंदी, पंढरपूरसह भंडारा डोंगर या तीर्थक्षेत्न विकासांच्या आराखडय़ातील कामांच्या वाढीव किमतींना आज मंजुरी देण्यात आली. या कामांमध्ये खासगी क्षेत्नाऐवजी शासकीय यंत्नणांच्या मार्फत ही कामे केली जातील, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. येथील विकासकामांच्या नवीन आराखडय़ासदेखील मंजुरी देण्यात आली. पंढरपूरमध्ये भूसंपादनासठी 164 कोटी रुपये, विकासकामांसाठी 77 कोटी रुपये तर अन्य प्रशासकीय कामांसाठी 23 कोटी रुपयांच्या निधीस या वेळी मंजुरी देण्यात आली. या नव्या कामांमध्ये पालखी मार्गाच्या विकासाच्या कामाचा समावेश आहे. या कामांसाठी लागणारी जमीन तातडीने संपादित करून पुढील वर्षापर्यंत काम पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
मोझरी विकास आराखडय़ातील पहिल्या टप्प्याचे काम जून 2क्15 पर्यंत करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याचबरोबर नवीन कामांसाठी दुस:या टप्प्याच्या नियोजनच्या सूचना संबंधित विभागांना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. शेगाव तीर्थक्षेत्नाचा मूळ विकास आराखडा हा 36क् कोटींचा होता. त्यात 111 कोटींच्या वाढीव खर्चास मंजुरी दिल्यामुळे आता हा आराखडा 471 कोटींचा झाला आहे. याशिवाय, 25 कोटी रुपयांच्या नवीन कामांना आजच्या बैठकीत मंजुरी दिली. तथापि, त्यासाठीची तरतूद डिसेंबरच्या नागपूर अधिवेशनातच होऊ शकणार आहे. (विशेष प्रतिनिधी)