पाच महिन्यांत भाज्यांचे भाव पाचपट

By admin | Published: June 4, 2016 03:38 AM2016-06-04T03:38:21+5:302016-06-04T03:38:21+5:30

दुष्काळामुळे भाजीपाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. राज्यभरातील सर्वच बाजारपेठांमध्ये आवक घटल्याने दर गगनाला भिडले आहेत. भेंडी, टोमॅटोचे दर पाच महिन्यांत पाच पट वाढले आहेत

In five months, the prices of vegetables five times | पाच महिन्यांत भाज्यांचे भाव पाचपट

पाच महिन्यांत भाज्यांचे भाव पाचपट

Next

नामदेव मोरे,  नवी मुंबई
दुष्काळामुळे भाजीपाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. राज्यभरातील सर्वच बाजारपेठांमध्ये आवक घटल्याने दर गगनाला भिडले आहेत. भेंडी, टोमॅटोचे दर पाच महिन्यांत पाच पट वाढले आहेत. किरकोळ बाजारात दोडका, घेवडा व इतर काही भाज्याही सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत.
राज्यात पडलेल्या दुष्काळाचा सर्वाधिक फटका भाजीपाला उत्पादकांना बसला आहे. पाणीच नसल्याने अनेकांनी भाजीपाल्याचे उत्पादनच घेतले नाही. परिणामी, राज्यभर भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. मुंबई बाजार समितीमध्ये रोज ६०० ते ७०० वाहनांची आवक होते. परंतु सद्य:स्थितीत ४०० ते ४५० वाहनांचीच आवक होत आहे. त्यातही लहान वाहनांचा समावेश जास्त आहे. राज्यातून आवक घटल्याने गुजरात व कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी येत आहे. सद्य:स्थितीमध्ये मुंबईमध्ये ४० ते ५० ट्रक माल परराज्यातून येत आहे. पुढील दोन महिने बाजारभाव असेच राहतील, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

मुंबईतील दर

जून
भेंडी७५ ते ८०
दुधी भोपळा६० ते ७०
फरसबी८० ते १००
फ्लॉवर६० ते ८०
गवार६० ते ८०
घेवडा१६० ते १८०
कारली६० ते ८०
कोबी४० ते ५०
दोडका१०० ते १२०

Web Title: In five months, the prices of vegetables five times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.