कबुतरबाजीत आणखी पाच जणांना बेड्या, बॅकस्टेज कलाकारांचा समावेश

By admin | Published: May 12, 2017 02:22 AM2017-05-12T02:22:06+5:302017-05-12T02:22:06+5:30

अल्पवयीन मुलांचे धर्मांतर करून त्यांना पंजाबहून पॅरिसला पाठविणाऱ्या टोळीतील आणखी पाच जणांना गुरुवारी गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत.

Five more people included in the clutches, backstage artists | कबुतरबाजीत आणखी पाच जणांना बेड्या, बॅकस्टेज कलाकारांचा समावेश

कबुतरबाजीत आणखी पाच जणांना बेड्या, बॅकस्टेज कलाकारांचा समावेश

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अल्पवयीन मुलांचे धर्मांतर करून त्यांना पंजाबहून पॅरिसला पाठविणाऱ्या टोळीतील आणखी पाच जणांना गुरुवारी गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. पाचही जण हे सिनेक्षेत्रात पडद्यामागील कलाकार आहेत. सलिम डे अरीया, जोगेंदर सिंग, सोहेल शेख, संजय परदेशी आणि मोहम्मद रफिक मेहमुद अली शेख अशी आरोपींची नावे असून, न्यायालयाने त्यांना १६ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हे पाचही जण गोरेगाव, अंधेरी, नालासोपारा, माहीम या भागांतील रहिवासी आहेत. गुन्हे शाखेच्या जबरी चोरी दरोडा विरोधी पथकाने मानवी तस्करीचे हे जाळे उधळून लावले. या प्रकरणात आरिफ फारुकी (३८), राजेश पवार, फातिमा अहमद या तिघांना यापूर्वीच अटक केली होती. त्यापाठोपाठ सुनील नंदवानी (५३), नरसैया मुंजली (४५) या दोघांनाही बेड्या ठोकल्या. त्यांच्यासह दक्षिण मुंबईतील रफिक पांचाळला बेड्या ठोकल्या. या आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.
या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच वरील पाच आरोपींची नावे समोर आली होती. त्यानुसार त्यांना अटक केली. या पाच जणांनी आतापर्यंत अनेक मुलांना परदेशात रवाना केले आहे. याबाबत तपास सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली.

Web Title: Five more people included in the clutches, backstage artists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.