चोरीसाठी पाच खून

By admin | Published: August 6, 2014 11:03 PM2014-08-06T23:03:11+5:302014-08-06T23:03:11+5:30

पुणो आणि नगर जिल्ह्यात दरोडे टाकणा:या टोळीचा नारायणगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

Five murders for theft | चोरीसाठी पाच खून

चोरीसाठी पाच खून

Next
>नारायणगाव : पुणो आणि नगर जिल्ह्यात दरोडे टाकणा:या टोळीचा नारायणगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीच्या मोहरक्याला सापळा रचून भोसरी एमआयडीसीत नुकतीच अटक केली असून, दरोडे टाकताना त्यांनी पाच खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्या तीन साथीदारांना यापूर्वीच अटक केली असून, अजून काही साथीदार फरार आहेत.
 बाब्या डबक्या काळे ऊर्फ डबक काळे (वय 22, रा. कोळगाव, ता. श्रीगोंदा, नगर) असे त्याचे नाव आहे. 
बेल्हे डावखरमळा येथे दि. 3 मार्च 2013 रोजी दरोडा पडला. यात दरोडेखोरांनी घरातील  मानसांना दगड, विटा व काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी  तीन आरोपींना अटक केली होती. त्यांच्याकडून साथीदारांची नावे निष्पन्न झाल्याने पोलीस त्यांचा शोध घेत होते. 
पुणो ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनाखाली खास पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने तब्बल आठ दिवस तपास करून बाब्या डबक्या काळे ऊर्फ डबक काळे याचा शोध घेतला. या गुन्ह्यातील यापूर्वी अटक केलेल्या आरोपींचा तो मोहरक्या आहे. त्याचे साथीदारांना अटक केल्यापासून तो फरार होता. 
आरोपीने यापूर्वी पुणो, अहमदनगर व इतर जिल्ह्यात अनेक दरोडे टाकून घरातील लोकांना जबर मारहाण करून त्यांचा खून करून घरातील मौल्यवान वस्तू व रोख रक्कम चोरून नेले आहेत. त्याच्या शोधासाठी केलेल्या पथकाने आठ दिवस अहोरात्न परिश्रम घेतले. अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोळगाव, भापकर वाडी, पिंपळगाव पिसा या परिसरामध्ये दरोडेखोराबाबत माहिती घेतली. 
बाब्या हा पसार झाल्यापासून कोळगाव (अहमदनगर) येथील  जंगलामध्ये राहतो व रात्नीच्या वेळी बाहेर पडतो, अशी माहिती मिळाली होती. त्यानंतर तो  पुणो येथे राहण्यास गेला आहे, अशी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी भोसरी येथे सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्या साथीदारांना पकडण्यासाठी त्याच्या अटकेची माहिती पोलिसांनी गुप्त ठेवली होती. 
बाब्या आणि त्याच्या साथीदारांनी नगर जिल्ह्यातील बेलवंडी, श्रीगोंदा, नगर येथील कोतवाडी पोलीस ठाण्याचे हद्दीत आणि शिक्रापूर याठिकाणी दरोडे टाकले होते. दरोडय़ाप्रसंगी बेलवंडी येथे दरोडय़ात दोन जणांना, तर श्रीगोंदा, शिक्रापूर, कोतवाडी येथे दरोडा टाकताना घरातील एक जणाला ठार केल्याचे कबूल केले. तसेच, त्याने आपल्या पाच साथीदारांसह हे दरोडे टाकल्याचे कबूल केले. बेल्हे येथील दरोडय़ातील दागिने त्याने पोलिसांना काढून दिले. असे  सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र थोरात आणि पोलीस उपनिरीक्षक पद्मभूषण गायकवाड यांनी सांगितले. (वार्ताहर)
 
4अहमदनगर येथे काळेगावच्या जंगलात ते रहात. रात्नीच्या वेळेसच जंगलातून बाहेर पडत. मिळेल त्या वाहनाने चोरी करण्यासाठी नगर व पुणो जिल्ह्यात जात. 
4रोडचे कडेला असणारे एकांटी घर हेरून तेथे दरोडा टाकत असे. एकास रोड जवळ व एकास घराचे बाहेर उभे करत. कटावणीने अगर मिळेल त्या हत्याराने घराचा दरवाजा उघडत. 
4घरातील लोक जागे झाल्यास आतला दरवाजा आतून दाबून धरल्यास बाहेरून मोठी दगडी मारून दरवाजा तोडत असे. कोणी प्रतिकार केला, तर डोक्यामध्ये धारदार शस्त्रने वार करत. 
4त्यात कोणी जखमी, तर कोणी ठार होत असे. चोरी केल्यानंतर मिळेल त्या ठिकाणाहून मोटार सायकल चोरी करून घेऊन जात व ती नदी, धरण, विहिरीमध्ये टाकून देत.

Web Title: Five murders for theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.