पाचपुतेंची लवकरच सोडचिठ्ठी!
By admin | Published: August 8, 2014 01:30 AM2014-08-08T01:30:41+5:302014-08-08T01:30:41+5:30
माजी आदिवासी विकासमंत्री तथा राष्ट्रवादीचे आमदार बबनराव पाचपुते यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे निश्चित केल्याचे समजते.
Next
>अहमदनगर : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच नगर जिल्ह्याचे राजकारण तापले असून, माजी आदिवासी विकासमंत्री तथा राष्ट्रवादीचे आमदार बबनराव पाचपुते यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे निश्चित केल्याचे समजते. कार्यकत्र्याना याबाबतचा निरोप पोहोचविण्यात आला असून, पाचपुते यांनी मात्र यावर भूमिका स्पष्ट केली नाही. आगामी निवडणुकीत अपक्ष किंवा भाजपाचा पर्याय खुला ठेवल्याची माहिती त्यांच्या अंतर्गत सूत्रंकडून मिळाली.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पराभवानंतर दक्षिण जिल्ह्यात पक्षाचे राजकारण ढवळून निघाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत अनेक उलथापालथी घडतील, अशी शक्यता व्यक्त झाली होती. ताज्या घडामोडीनंतर त्यावर शिक्कामोर्तब होताना दिसत आहे. पक्षात झालेली कोंडी आमदार पाचपुते यांच्या जिव्हारी लागल्याचे बोलले जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अव्हेरल्या पाठोपाठ पालकमंत्री मधुकर पिचड यांच्याशी शाब्दिक वाद झाल्याने त्यांनी आता पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पुढे आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याच्या संशयावरून उपमुख्यमंत्री पवार यांनी पाचपुते यांची कोंडी केल्याची चर्चा आहे. साईकृपा साखर कारखान्यासाठी मंजूर झालेले कर्ज पवार यांच्याच आदेशावरून अडविण्यात आले, अशी चर्चा आहे. हा वाद शमण्याऐवजी पुढे वाढतच गेला. एकीकडे आर्थिक कोंडी केल्यानंतर पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरही जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याचा आरोप त्यांचे समर्थक करीत आहेत. ही धुसफूस गुरुवारी एका निर्णायक वळणावर पोहोचली आहे. त्यांनी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतल्याचा निरोप त्यांच्या कार्यकत्र्यार्पयत पोहोचला होता.
त्यांच्या गोटातील हालचालींनुसार पाचपुते अपक्ष लढतील, अशी दाट शक्यता आहे. भाजपाशीही त्यांनी संपर्क ठेवला आहे. विनायक मेटे मध्यस्थाच्या भूमिकेत असल्याची माहिती आहे. पाचपुतेंनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यास मतदारसंघातील राजकारणात मोठी उलथापालथ होणार आहे. पाचपुते सात वेळा निवडणुकीला सामोरे गेले. त्यापैकी सहा वेळा त्यांनी विजय मिळवला. दरवेळी नवा पक्ष किंवा चिन्ह घेऊन यश मिळविण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. आता परिस्थिती मात्र वेगळी आहे. आज पाचपुतेंकडे प्रस्थापित राजकारणी म्हणून पाहिले जाते. त्यामुळे मतदारसंघात विरोधकांकडून त्यांना या वेळी कडव्या विरोधाचा सामना करावा लागत आहे. मात्र, भाजपाशी त्यांची जवळीक लपून राहिलेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद, राज्यात मंत्रिपद भूषविलेले आमदार पाचपुते पक्ष सोडल्यावर अपक्ष लढणार की भाजपाकडून, याविषयी उत्सुकता आहे. (प्रतिनिधी)
च्दरम्यान, या विषयावर स्पष्ट बोलणो आमदार पाचपुते यांनी टाळले. ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, काही क्रियाच नाही तर त्यावर प्रतिक्रिया कशी देणार? अद्याप मी पक्षात समाधानी आहे.