दोन अपघातांत पाच जण ठार

By Admin | Published: October 29, 2016 11:53 PM2016-10-29T23:53:42+5:302016-10-29T23:53:42+5:30

जिल्ह्यातील कर्जत व पारनेर तालुक्यात शनिवारी दोन विविध ठिकाणी झालेल्या अपघातांत पाच जणांचा मृत्यू

Five people killed in two accidents | दोन अपघातांत पाच जण ठार

दोन अपघातांत पाच जण ठार

googlenewsNext

अहमदनगर : जिल्ह्यातील कर्जत व पारनेर तालुक्यात शनिवारी
दोन विविध ठिकाणी झालेल्या अपघातांत पाच जणांचा मृत्यू
झाला़ नगर-पुणे महामार्गावरील नारायणगव्हाणनजीक (पारनेर) भरधाव मोटारीची टक्कर होऊन मोटारसायकलवरील तिघे जागीच मृत्युमुखी पडले. तर नगर-सोलापूर महामार्गावरील मिरजगावनजीक मोटार-आराम बस यांच्यात
झालेल्या अपघातात मायलेकाचा जागीच मृत्यू झाला़
नारायणगव्हाणनजीकच्या अपघातात किरण चंद्रकांत चांदणे (वय २२), विनोद चंद्रकांत चांदणे (२४), रोहित सुंदर झिने (१८, तिघे रा. हार्शी ता. पैठण जि. औरंगाबाद) हे मृत्युमुखी पडले. मृत तिघे मोटारसायकलवरून पुण्याहून नगरच्या दिशेने जात होते. समोरून आलेल्या मोटारीशी त्यांची टक्कर झाली. ही टक्कर एवढी जबरदस्त होती की तिघांचा जागीच मृत्यू झाला. किरण आणि विनोद चांदणे हे दोघे सख्ख्ये भाऊ आहेत.
मिरजगावनजीकच्या अपघातात योगेश बाळासाहेब मांडगे (२४) व सुरेखा बाळासाहेब मांडगे (४४, रा़ गायकरवाडी, ता़ कर्जत) हे मायलेक मृत्युमुखी पडले़ योगेश मोटारीमधून आई सुरेखा यांना नगर येथे आरोग्य तपासणीसाठी घेऊन आला
होता़ परतत असताना खासगी
आराम बसने त्यांना टक्कर
दिली. अपघातानंतर बसने सुमारे
साठ फूट मोटारीला फरफटत नेले़
नंतर बस विजेच्या खांबावर
आदळली़ हा आवाज ऐकून या परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. दोन्ही अपघातग्रस्त वाहनांवर विद्युतप्रवाह चालू असलेल्या तारा पडलेल्या होत्या़ त्यांनी प्रथम वीजपुरवठा खंडित केला़ यानंतर मोटारीतून आई व मुलाला बाहेर काढले़ मात्र, त्यांची प्राणज्योत मालवली होती़ आराम बसमध्ये ६० प्रवासी होते. त्या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)

- योगेश हा एकुलता एक मुलगा होता़ नुकतेच त्याचे इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाले होते़ आई व मुलाचा असा अचानक अंत झाल्याने गायकरवाडीवर दु:खाची छाया पसरली़ शोकाकुल वातावरणात या माय-लेकरावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Five people killed in two accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.