दोन वेगळया अपघातात पाच जण मृत्युमुखी
By Admin | Published: April 24, 2016 02:56 AM2016-04-24T02:56:49+5:302016-04-24T10:05:19+5:30
अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यात झालेल्या दोन वेगळया अपघातात पाच जण मृत्युमुखी पडले. यामध्ये मुंबईतील दोन भाविकांचाही समावेश आहे.
अहमदनगर / सोलापूर : अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यात झालेल्या दोन वेगवेगळ््या अपघातात पाच जण मृत्युमुखी पडले. यामध्ये मुंबईतील दोन भाविकांचाही समावेश आहे.
पंढरपूरहून देवदर्शन करुन सोलापूरकडे निघालेल्या भाविकांच्या मोटारीला अपघात होऊन दोन जण मृत्युमुखी पडले. हा अपघात सकाळी पावणेसातच्या सुमारास तुंगत गावाजवळ झाला. यात ओमनीतील दोन जण मृत्युमुखी पडले. ओमनी चालक निवृत्ती नारायण मरे (४०, रा. पवई मुंबई) व शकुंतला अंगद पवार ( ४८, डोंबिवली, मुंबई) हे जागीच मृत्युमुखी पडले. तर अंगद धोडीराम पवार (५४), अच्युत अंगद पवार (३५, दोघे रा. डोंबिवली, मुंबई) व मोटारसायकलस्वार राजेंद्र रणदिवे (२५, तुंगत, पंढरपूर) हे जखमी झाले. अपघातानंतर आयशर चालक गाडी सोडून पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. तर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील नगर-दौंड राज्यमार्गावर पांढरेवाडी शिवाराजवळ झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले तर सहा जण गंभीर जखमी झाले़ या अपघातात २३ शेळ्या, मेंढ्याचाही बळी गेला असून, १५ मेंढ्या जखमी झाल्या आहेत़ टेम्पो चालक सागर बाळासाहेब पागिरे (वय २२,रा़ घोसपुरी) विष्णू विठोबा लाड (वय ६०), साहेबराव भिमाजी लाड (वय ५६) अशी मृतांची नावे आहेत. (प्रतिनिधी)