हॉटेलसाठी पाच परवानग्या रद्द

By admin | Published: January 31, 2016 03:15 AM2016-01-31T03:15:57+5:302016-01-31T03:15:57+5:30

हॉटेल आणि आदरातिथ्य उद्योगासाठी गृहविभागाकडून घ्याव्या लागणाऱ्या पाच परवानग्या रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.

Five permissions for the hotel canceled | हॉटेलसाठी पाच परवानग्या रद्द

हॉटेलसाठी पाच परवानग्या रद्द

Next

मुंबई : हॉटेल आणि आदरातिथ्य उद्योगासाठी गृहविभागाकडून घ्याव्या लागणाऱ्या पाच परवानग्या रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.
राज्यातील उद्योग-व्यवसायाला चालना देण्यासाठी ‘इज आॅफ डुइंग बिझनेस’ या मोहिमेंतर्गत शासकीय परवानग्यांची संख्या कमी करण्यात येत आहेत. त्यानुसार, गेल्या वर्षभरात उद्योगाच्या उभारणीसाठी आवश्यक परवानग्यांची संख्या निम्म्यापेक्षाही कमी करण्यात सरकारला यश आले आहे.
हॉटेलांना आता खाद्यनोंदणी प्रमाणपत्र, स्विमिंग पूल परवाना, सार्वजनिक मनोरंजनाच्या ठिकाणासाठी परवाना, तसेच सादरीकरण परवाना या पाच परवानग्यांची आवश्यकता राहणार नाही. त्यामुळे विलंब कमी होऊन हॉटेल उद्योगास चालना मिळेल. आता स्थानिक स्वराज्य संस्थेने आणि
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या परवान्यानंतर हॉटेल व आदरातिथ्य व्यवसाय सुरू करता
येईल. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Five permissions for the hotel canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.