दिंडोशी हत्याकांडानंतर पाच पोलिसांची बदली

By admin | Published: October 24, 2014 04:20 AM2014-10-24T04:20:57+5:302014-10-24T04:20:57+5:30

मालाड येथे शिवसेना गटप्रमुख रमेश जाधव यांच्या हत्येनंतर घडलेल्या प्रकारामुळे हलगर्जीपणाचा ठपका ठेवून दिंडोशी पोलीस ठाण्यातील ५ पोलीस अधिका-यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत.

Five police officers transferred after Dindoshi massacre | दिंडोशी हत्याकांडानंतर पाच पोलिसांची बदली

दिंडोशी हत्याकांडानंतर पाच पोलिसांची बदली

Next

मुंबई : मालाड येथे शिवसेना गटप्रमुख रमेश जाधव यांच्या हत्येनंतर घडलेल्या प्रकारामुळे हलगर्जीपणाचा ठपका ठेवून दिंडोशी पोलीस ठाण्यातील ५ पोलीस अधिका-यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत.
दिंडोशी सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र कोटक, पोलीस निरीक्षक अरुण रामकृष्णा राजामे, सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद विष्णू पितळे, पोलीस उपनिरीक्षक नितीन केदू खैरनार या ४ अधिकाऱ्यांची बदली स्थानिक सशस्त्र पोलीस विभागात करण्यात आली आहे.
दिंंडोशीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष डफळे यांची बदली संरक्षण आणि सुरक्षा विभागात करण्यात आली आहे. या पाच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या प्रशासकीय कारणास्तव करण्यात आल्याची माहिती पोलीस जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली. या हत्याप्रकरणाचे परिसरात तीव्र पडसाद उमटले होते.
(प्रतिनिधी)

Web Title: Five police officers transferred after Dindoshi massacre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.