बाळासाहेबांच्या नावाने पाच योजना जाहीर
By admin | Published: January 23, 2016 04:05 AM2016-01-23T04:05:52+5:302016-01-23T04:05:52+5:30
राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि परिवहन विभागाच्यावतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध लोकोपयोगी योजनांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि परिवहन विभागाच्यावतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध लोकोपयोगी योजनांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
हा लोकार्पण सोहळा २३ जानेवारीला सकाळी ९.३० वाजता मुंबई सेंट्रल येथील महामंडळाच्या आगारात आयोजित केला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. (प्रतिनिधी)
एस.टी. महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मुलीला तिच्या वयाच्या २१व्या वर्षी विवाहासाठी १ लाख रु पये दिले जाणार आहेत. या योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१६पासून पुढे जन्मास येणाऱ्या कन्यांच्या नावे एसटी महामंडळातर्फे १७ हजार ५०० इतकी रक्कम मुदत अथवा दामदुप्पट योजनेत एस.टी. बँकेत ठेवण्यात येईल.
अपघात सहायता
निधी योजना
या योजनेअंतर्गत परिवहन महामंडळाच्या बस अपघातामध्ये मृत झालेल्या व्यक्तीच्या वारसास
१० लाख रुपये, कायमचे अपंगत्व आलेल्या व्यक्तीला ५ लाख रुपये, अंशत: विकलांग झालेल्या व्यक्तीस
२ लाख ५० हजार रुपये व तात्पुरते अपंगत्व आलेल्या व्यक्तीस १ लाख रुपये देण्यात येणार आहेत. या योजनेस लागणारा निधी निर्माण करण्यासाठी रा.प. बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सरसकट तिकिटावर १ रु पया नाममात्र अधिभार आकारण्यात येणार आहे. ‘१ रुपयात १० लाखांचा विमा’ असे योजनेचे स्वरूप असणार आहे.
शिवशाही बस सेवा
‘शिवशाही’ बस प्रकल्पाद्वारे सामान्यांना परवडणाऱ्या दरामध्ये ५०० वातानुकूलित बसेस सुरू केल्या जाणार असून, या बसेस एप्रिलपर्यंत महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. वाढत्या खासगी वाहतुकीला शह देण्यासाठी तसेच प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी या गाड्यांमध्ये आरामदायी आसने, वाचनासाठी दिवे, सी.सी.टी.व्ही., वाय-फाय, जीपीएस, मोबाइल व लॅपटॉप चार्जर्सची सोय असेल. आसनाला व शयनयानाला
९ इंची एलईडी स्क्र ीन असणार आहे. या बसेस मराठवाडा, विदर्भ, कोकणातील प्रवाशांना व राज्यातील सर्व प्रमुख शहरांना जोडतील अशा पद्धतीने वेळापत्रक तयार करण्यात येत आहे.महिलांना ५ टक्के आरक्षित : राज्य नवीन रिक्षा परवान्यासाठी आॅनलाइन लॉटरीत महिलांना ५ टक्के आरक्षित करण्यात आले असून, महिलांकरिता ‘अबोली रंगाची रिक्षा’ सुनिश्चित करण्यात आली आहे.