कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांचे पाच लघुपट राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात

By Admin | Published: January 18, 2017 06:47 PM2017-01-18T18:47:42+5:302017-01-18T18:47:42+5:30

कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनी पाच लघु चित्रपटाची निर्मिती करून शैक्षणिक वाटचालीत एक अनोखा पल्ला गाठलेला आहे.

Five short films at Convent Students at National Film Festival | कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांचे पाच लघुपट राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात

कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांचे पाच लघुपट राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 18 - येथील श्री व्यंकटेश बालाजी इंग्रजी कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनी पाच लघु चित्रपटाची निर्मिती करून शैक्षणिक वाटचालीत एक अनोखा पल्ला गाठलेला आहे. निर्मिती केलेल्या लघु चित्रपटांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्यात आला आहे. फेब्रुवारी १७ महिन्यात हे पाचही लघुपट राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सादर होणार असल्याची माहिती संस्थाध्यक्ष प्रा. ज्ञानेश्वर ढेरे यांनी दिली आहे.
प्रदीप अवचार यांच्या सिद्धहस्त लेखणीतून व प्रभावी दिग्दर्शनातून साकारलेल्या प्रा. अवधूत ज्ञानेश्वर ढेरे निर्मित करुणा, घे भरारी, आॅनेस्टीबॉक्स, शर्यत आणि धोबी पछाड या पाच लघुपटाचे प्रदर्शन बालक दिन व सांस्कृतक समारोहात पत्रकार प्रा. अविनाश बेलाडकर आणि दिलीप देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले आहे. व्यंकटनाथ महाराज शिक्षण संस्थेंतर्गत व्यंकटेश बालाजी इंग्लिश हायस्कूल प्रस्तुत पहिल्या ‘करुणा’ लघुपटाची सुरुवातच मुळी एकीकडे शाळेतीलच बांधकामवावर मजूर म्हणून राबणारी मुलगी व दुसरीकडे शिस्ती राष्ट्रगीत सादर करणारे विद्यार्थी अशा विरोधाभासातून होते. ‘वाटेवरची कांचा गं, हळूच त्या वेचा गं’ ही वर्गखोलीत विद्यार्थ्यांना शिकविल्या जाणारी कविता वर्गातील विद्यार्थी नव्हे तर बालमजुर करूणा बार्इंना मूकपाठ म्हणून दाखवते व सर्वांना आवक करीत डोळ्याच्या कडा ओल्या करते. राईट टू एज्युकेशनचा संदेश देणारा हा लघुपट उपस्थितांच्या टाळ्या घेऊन गेला.
एका चिमुकल्या विद्यार्थ्याचा रक्तबांबळ तळहात पडद्यावर दाखवत सुरू होणारा ‘घे भरारी’ हा लघुपट चित्रकलेत पारंगत असलेला मात्र पालकांच्या अपेक्षाचे ओझे पेलत अतबल होणारा विद्यार्थी चित्रकलेचे राष्ट्रीय पारितोषिक पटकावतो.पालकांनी कशी कृती करावी, हा संदेश देऊन जातो. ‘प्रामाणिकपणा’ मूल्य जीवन ध्येय संस्कार... सुखी, समृद्ध जीवनाचा्या सीमारेषा हा संदेश देनारा ‘आॅनेस्टी बॉक्स’ हा लघुपट लघुश्रुंखला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो. मित्र कसा असावा, यासोबतच सामंजस्याची शिकवण रुजविण्याचा यशस्वी प्रयत्न करणारा ‘शर्यत’ आणि घराघरातील समस्येवर तोडगा शोधणारा ‘धोबी पछाड’ हे दोन लघुपट आपले इटसीत चवखलपणे साधतात. प्रदर्शन संपताच होणारा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट पालकांच्या पावतीने द्योतक ठरतो. यावेळी विद्यार्थ्यांच्या अभिनयात कुठेही नवखेपणा नव्हता.  परिणामकारकतेचा प्रत्यय निर्मिती प्रक्रियेदरम्यान आला. महत्वाचे विषय शाळेला व पालकांना देण्याचा उद्देश सफल झाला, असे मत दिग्दर्शक व पटकथा लेखक प्रदीप अवचार यांनी व्यक्त केले. व्यंकटनाथ महाराज शिक्षण संस्था अध्यक्ष प्रा. ज्ञानेश्वर ढेरे, कोषाध्यक्ष प्रा. राजेंद्र ताठे, सचिव रजश्री गोळे, संचालक प्रा. अवधूत ढेरे, प्राचार्या सारिका कडू, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यावेळी उपस्थित होते.

Web Title: Five short films at Convent Students at National Film Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.