पंचरंगी आखाडा
By admin | Published: October 2, 2014 02:51 AM2014-10-02T02:51:34+5:302014-10-02T02:51:34+5:30
बुधवारी अखेरच्या दिवशी राज्यातील 288 मतदारसंघांतील लढतींचे चित्र स्पष्ट झाले असून, काही अपवाद वगळता सर्वत्र पंचरंगी सामने होत आहेत.
Next
निवडणुकीचे चित्र स्पष्ट : राष्ट्रवादीचे डावपेच अंगलट, ‘स्वाभिमानी’ला बंडखोरीचा फटका
मुंबई/कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या अर्ज मागे घेण्याच्या आज, बुधवारी अखेरच्या दिवशी राज्यातील 288 मतदारसंघांतील लढतींचे चित्र स्पष्ट झाले असून, काही अपवाद वगळता सर्वत्र पंचरंगी सामने होत आहेत. काही मतदारसंघांमध्ये अधिकृत उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेऊन राजकीय पक्षांची चांगलीच अडचण केली.
द. महाराष्ट्रात निवडून आणण्यापेक्षा पाडापाडीचेच डावपेच आखले गेले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक नेते, मंत्री आणि विद्यमान आमदारांना अडचणीत आणण्यासाठी स्थानिक पातळीवर कोणाला पाडायचे, याचीच जोरदार आखणी केली गेली. विशेष म्हणजे राष्ट्रवादीने उमेदवार मागे घेणो आणि काही ठिकाणी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देण्यासारखे अनपेक्षित प्रकार घडले आहेत.
दक्षिण क:हाड मतदारसंघात पृथ्वीराज चव्हाण यांना अडचणीत आणण्यासाठी राष्ट्रवादीने डावपेच केले, मात्र ते त्यांच्यावरच उलटले. राष्ट्रवादीने क:हाडचे उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांना उमेदवारी दिली होती. मात्र शेवटच्या क्षणी उमेदवारी मागे घेऊन काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विलासकाका पाटील-उंडाळकर यांना पाठिंबा देण्याचे फर्मान पक्षाने सोडले. याची कुणकुण लागताच नाराज झालेल्या
राजेंद्र यादव यांनी चव्हाण यांना पाठिंबा दिला. त्यामुळे राष्ट्रवादीला उमेदवारच राहिला नाही. त्यामुळे रात्री उशिरा उंडाळकर यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घ्यावा लागला. (विशेष प्रतिनिधी)
राजू शेट्टींचे उमेदवार अडचणीत
खासदार राजू शेट्टी यांच्या मतदारसंघात स्वाभिमानी पक्षच अनेक ठिकाणी अडचणीत आला आहे. शिरोळमध्ये स्वाभिमानीचे उमेदवार अनिल मादनाईक यांच्याविरोधात बंड करून शिवसेनेचे उल्हास पाटील यांना राष्ट्रवादी तसेच काँग्रेसमधील काही गटांनी पाठिंबा दिला आहे.
राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांचे चिरंजीव धैर्यशील माने यांचा त्यामध्ये समावेश आहे. स्वाभिमानीचा दबदबा असलेल्या कर्नाटक सीमेवरील चंदगड मतदारसंघात सर्वच पक्षांना बंडखोरीला सामोरे जावे लागले आहे. पक्षाचे उमेदवार राजेंद्र गड्डय़ान्नावर यांच्याविरोधात तालुकाध्यक्ष नितीन पाटील यांनी बंडखोरी केली आहे.
जयंत पाटलांविरुद्ध विरोधकांची एकी
सांगली जिल्ह्यात इस्लामपूर मतदारसंघातून ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्याविरोधात एकच उमेदवार देण्यासाठी काँग्रेस, शिवसेना, भाजपा आणि स्वाभिमानी यांनी मोट बांधण्याचा प्रयत्न केला. त्यात काँग्रेसवगळता सर्व पक्ष एकत्र आले असून, स्वाभिमानीचे अभिजित पाटील यांना सर्वानी पाठिंबा दिला आहे. शिवसेनेचे भीमराव माने, भाजपाचे विक्रम पाटील, अपक्ष नानासाहेब महाडिक आदींनी अभिजित पाटील यांच्यासाठी माघार घेतली.
राज यांची सभा न मिळाल्याने माघार
जिंतूर (जि.परभणी) मतदारसंघातील मनसेचे उमेदवार खंडेराव आघाव यांनी राज ठाकरे यांची सभा न मिळाल्याने निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली.
डॉ. भांडे यांचाही काढता पाय
अकोला पूर्व मतदारसंघातून माजी मंत्री डॉ. दशरथ
भांडे यांनी भारिप-बहुजन महासंघाचे तिकीट न मिळाल्याने निवडणुकीतून काढता पाय घेतली.
सेनेच्या राजूल पटेल मैदानाबाहेरच
सेनेच्या वर्सोव्यातील उमेदवार राजूल पटेल यांचा
अर्ज आयोगाने रद्द ठरवल्यानंतर हाय कोर्टाने यात हस्तक्षेपास नकार दिला़ त्या मैदानाबाहेरच राहतील.
भाजपाविरुद्ध बंड : तासगावमध्ये स्वाभिमानीचे प्रवक्ते महेश खराडे हे भाजपाच्या उमेदवाराविरुद्ध बंड करून शिवसेनेकडून रिंग्ांणात आहेत, तर पलूस-कडेगावमध्ये पतंगराव कदम यांच्याविरोधात भाजपाचे पृथ्वीराज देशमुख व स्वाभिमानीचे संदीप राजोबा या दोघांनीही रिंग्ांणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.