स्पेशल स्कॉडच्या नावाखाली लूटणाऱ्या मुंबईतील पाच संशयितांना नाशिकमध्ये अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 05:32 PM2018-07-16T17:32:48+5:302018-07-16T20:32:08+5:30
नाशिक : अवैध गॅस वाहतूक, विक्री तसेच गुटखा विक्री रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या स्पेशल स्कॉडमधील अधिकारी असल्याची बतावणी करून मुंबईतील पाच संशयितांनी एका गॅस एजन्सीतील सिलिंडरचे वितरण करणाºया डिलीव्हरी बॉयला अडवून मारहाण करीत त्याच्याकडील रक्कम लूटल्याची घटना रविवारी (दि़१५) सकाळच्या सुमारास आडगाव पोलीस ठाण्यातील विडी कामगारनगरध्ये घडली़ या प्रकरणी मुंबईतील पाच तोतया अधिकाºयांना आडगाव पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याविरोधात दरोड्यासह खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे़
नाशिक : अवैध गॅस वाहतूक, विक्री तसेच गुटखा विक्री रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या स्पेशल स्कॉडमधील अधिकारी असल्याची बतावणी करून मुंबईतील पाच संशयितांनी एका गॅस एजन्सीतील सिलिंडरचे वितरण करणा-या डिलीव्हरी बॉयला अडवून मारहाण करीत त्याच्याकडील रक्कम लूटल्याची घटना रविवारी (दि़१५) सकाळच्या सुमारास आडगाव पोलीस ठाण्यातील विडी कामगारनगरध्ये घडली़ या प्रकरणी मुंबईतील पाच तोतया अधिका-यांना आडगाव पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याविरोधात दरोड्यासह खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आडगाव शिवारातील हनुमाननगरमध्ये मिलिंद जोधळे राहत असून तो गॅस एजन्सीतील सिलिंडर वितरणाचे काम करतो़ रविवारी (दि़१५) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास अॅपे रिक्षात सिलिंडर भरून ते पोहोचविण्यासाठी विडी कामगारनगरमधील तुलसी कॉलनीतून जात होता़ यावेळी कारमधून आलेले संशयित संजय मुकुंद चौघुले (३४, रा. घर नंबर ११८४, धारावी, मुंबई), रामचंद्र साहेबराव शिंदे (३६, रा. टिळकनगर, मुंबई), आसिफ खान (३२, चेंबूर पूर्व, मुंबई), राजेश घनश्याम लाख (४२, रा. चिंचपोकळी, मुंबई), अजगर खान (४२, रा. चेंबूर पूर्व, मुंबई) व त्यांचे दोन साथीदार यांनी रिक्षा अडविली़
नाशिकमधील अवैध गॅस व गुटखा विक्री रोखण्याचे हे मुंबईचे पथक असून रिक्षातील गॅस सिलिंडर हे अवैध असून तुला आडगाव पोलिसांत जमा करून गुन्हा दाखल करतो अशी धमकी दिली़ तर संशयितांपैकी काहींनी मारहाण करीत शिखातील गॅसविक्रीचे दोन हजार शंभर रुपये बळजबरीने काढून घेतले़ या प्रकारामुळे घाबरलेल्या मिलिंदने भाऊ अनिल जोंधळे यास घटनेची माहिती दिली असता संशयितांनी प्रकरण मिटविण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली़ त्यानुसार अनिल जोंधळे हा कसेबसे ४० हजार रुपये घेऊन आले असता ते पैसे घेत संशयितांनी या दोघांना आडगाव पोलीस ठाण्याशेजारील एका कॉलनीत नेले व उर्वरीत ६० हजार रुपयांची मागणी केली़
तोतया अधिका-यांनी जोंधळे बंधुना मारहाण करून पैसे घेतले मात्र रिक्षा जप्त न करता ती सोडून दिल्याने मिलिंद यांना संशय आला व त्यांनी आडगाव पोलीस ठाणे गाठत पोलिसांना माहिती दिली़ आडगावचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी पोलीस उपनिरीक्षक दिनेश मुळे, सहाय्यक उपनिरीक्षक दिलीप शिंदे, हवलदार मुनीर काझी, संजीव जाधव, विनोद लखन, मनोज खैरे, दिनकर भुसारे आदींचे पथक पाठवून हॉटेल समाधानजवळ संशयास्पदरित्या थांबलेल्या कारमधील सातपैकी पाच जणांना ताब्यात घेत चौकशी केली असता ते शासनाचे प्रतिनिधी नसल्याचे उघड झाले. पोलिसांनी चारचाकी तसेच दोन हजार शंभर रुपयांची रोकड जप्त केली.
या प्रकरणी अनिल जोंधळे यांच्या फिर्यादीनुसार मुंबईतील या पाचही संशयितांविरोधात दरोडा, खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, अटक केलेले संशयित हे मुंबईतील वॉटेड गुन्हेगार आहेत का? त्यांच्यावर लुटीचे आणखी गुन्हे दाखल आहेत का? याबाबत आडगाव पोलीस तपास करीत आहेत़