पेपरफुटीप्रकरणी पाच निलंबित
By admin | Published: December 26, 2015 01:21 AM2015-12-26T01:21:59+5:302015-12-26T01:21:59+5:30
जिल्हा परिषद आरोग्यसेविका आणि औषधनिर्माता पदाच्या परीक्षेचा पेपरही फुटला असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासातून उजेडात आली आहे.
- जिल्हा परिषद परीक्षा
सांगली : जिल्हा परिषद आरोग्यसेविका आणि औषधनिर्माता पदाच्या परीक्षेचा पेपरही फुटला असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासातून उजेडात आली आहे.
दोन्ही परीक्षांचा पेपर फोडणारी कर्मचाऱ्यांची टोळी जिल्हा परिषदेतील असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी जिल्हा परिषद, पंचायत समितीतील पाच कर्मचाऱ्यांना अटक झाली आहे. त्यांच्यावर निलंबनाची कारवाईही करण्यात आली आहे.
पेपर फोडणाऱ्या टोळीमधील रामदास आनंदा फुलारे (४२, रा. हुबालवाडी, ता. वाळवा), शशांक श्रीकांत जाधव (२५, वडगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), सतीश शिवाजी मोरे (३६, कवलापूर, ता. मिरज), अशोक श्यामराव माने (३५, कामेरी, ता. वाळवा), शिवाजी पांडुरंग गायकवाड (३३, म्हाळुंगे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांचा समावेश आहे.
यातील फुलारे मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यास गुरुवारी रात्री ताब्यात घेऊन अटक करण्यात आली, तर अन्य चार संशयितांना गुरुवारी सकाळीच अटक केली होती. (प्रतिनिधी)