रसायनाने पिकवले जाणारे पाच टन आंबे गोव्यात जप्त
By admin | Published: June 17, 2016 06:41 PM2016-06-17T18:41:03+5:302016-06-17T18:41:03+5:30
येथे रसायनांच्या वापराने कृत्रिमरीत्या पिकवले जाणारे नीलम जातीचे सुमारे पाच टन आंबे जप्त करण्यात आले. शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
Next
ऑनलाइन लोकमत
डिचोली (गोवा) : येथे रसायनांच्या वापराने कृत्रिमरीत्या पिकवले जाणारे नीलम जातीचे सुमारे पाच टन आंबे जप्त करण्यात आले. शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या आंब्यांची किंमत सुमारे एक लाख रुपये होते. मानवी आरोग्यास घातक असणारे हे सर्व आंबे नष्ट केले जातील, असे कारवाई करणा:या अन्न आणि सुरक्षा विभागातील अधिका:यांनी स्पष्ट केले. दोन महिन्यांसाठी कोणताही करार वगैरे न करता खोल्या भाडय़ाने घेऊन आंबे पिकवले जात होते. त्यासाठी वापरली जाणारी रसायनेही या विभागाने जप्त केलेली आहेत. ती प्रयोगशाळेकडे तपासासाठी पाठवलेली आहेत.