पाच वर्षांत येऊ शकते लाखो नोकऱ्यांवर टाच!

By admin | Published: April 27, 2016 06:52 AM2016-04-27T06:52:10+5:302016-04-27T06:52:10+5:30

येत्या पाच ते दहा वर्षांत ५० ते ७० लाख नोकऱ्यांवर टाच येऊ शकते, अशी भीती जागतिक आर्थिक संघटनेने (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) वर्तविली आहे.

Five years to get the jobs of millions! | पाच वर्षांत येऊ शकते लाखो नोकऱ्यांवर टाच!

पाच वर्षांत येऊ शकते लाखो नोकऱ्यांवर टाच!

Next

मुंबई : चौथी औद्योगिक क्रांती येऊ घातली असून, लवकरच त्याचे परिणाम दिसू लागणार आहेत. जवळपास सर्वच क्षेत्रांत तंत्रज्ञानाचा वापर वाढला असून, येत्या पाच ते दहा वर्षांत ५० ते ७० लाख नोकऱ्यांवर टाच येऊ शकते,
अशी भीती जागतिक आर्थिक संघटनेने (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) वर्तविली आहे.
दावोस येथे जागतिक आर्थिक संघटनेची नुकतीच एक परिषद झाली. त्यात त्यांनी मांडलेल्या अहवालात कौशल्य विकासाअभावी आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे असंख्य नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात, असा अंदाज वर्तविला आहे. सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स आणि जैवतंत्रज्ञानात झपाट्याने बदल होत आहेत. कुशल कामगारांच्या अभावामुळे अनेक उद्योग क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. हॉस्पिटॅलिटी अर्थात सेवा उद्योगात आणि वस्तुनिर्मिती उद्योगात सध्या मोठ्या प्रमाणात रोबोट्सचा वापर वाढला आहे. चीन आणि जपानमध्ये हे प्रमाण अधिक आहे. जपानमध्ये प्रत्येक १० हजार कामगारांमागे १५०० रोबोट काम करत आहेत. हे प्रमाण येत्या काळात वाढणार असून, कामगारांच्या रोजगारावर त्याचा परिणाम होईल.

Web Title: Five years to get the jobs of millions!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.