राज्यसभेतल्या 'त्या' प्रकारानंतर राज्यपालांचं उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्षांना पत्र; केली महत्त्वाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 05:24 PM2020-07-25T17:24:24+5:302020-07-25T17:41:27+5:30

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्षांकडे पत्राद्वारे मागणी

fix advisory for all ministers and members in the context of oath taking governor writes to vice president and lok sabha speaker | राज्यसभेतल्या 'त्या' प्रकारानंतर राज्यपालांचं उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्षांना पत्र; केली महत्त्वाची मागणी

राज्यसभेतल्या 'त्या' प्रकारानंतर राज्यपालांचं उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्षांना पत्र; केली महत्त्वाची मागणी

Next

मुंबई: नव्याने निवडून आलेले काही संसद सदस्य तसेच विधानमंडळ सदस्य शपथ घेताना निर्धारित प्रारुपातील शपथ न घेता त्यामध्ये आपल्या पक्षाचे नेते तसेच आराध्य व्यक्तींची नावे जोडून शपथ घेत असल्याचे नमूद करून या संदर्भात सर्व संबंधितांकरिता निश्चित अशी मार्गदर्शक तत्वे / आचारसंहिता ठरवून देण्याची विनंती महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली आहे. दोनच दिवसांपूर्वी राज्यसभेत भाजपा नेते उदयनराजे भोसलेंनी खासदारकीची शपथ घेतल्यानंतर जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा दिल्या. त्यानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी त्यांना समज दिली. यानंतर शिवप्रेमींनी संतप्त भावना व्यक्त केल्या. विरोधकांनी भाजपावर सडकून टीका केली. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्यपाल कोश्यारींनी उपराष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू व लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना स्वतंत्र पत्र पाठवून राज्यपालांनी शपथ ग्रहण विधीचे पावित्र्य व गांभीर्य जतन करण्यासाठी अश्या प्रकारच्या मार्गदर्शक तत्वांची गरज असल्याचे नमूद केले आहे. आपल्या आवडत्या पक्ष नेत्यांचे अथवा आपली श्रद्धा व निष्ठा आहे अश्या आराध्य व्यक्तींचे नाव शपथेच्या प्रारूपामध्ये जोडल्यामुळे शपथ विधी प्रक्रियेचे गांभीर्य कमी होते, असे कोश्यारी यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.  

महाराष्ट्रात मंत्री पदाची शपथ देताना काही सदस्यांना आपण शपथ ‘लिहिली आहे त्याच स्वरुपात कुठलीही नावे न जोडता’ पुन्हा वाचण्याची सूचना केली होती याचे राज्यपालांनी आपल्या पत्रात स्मरण केले आहे. शपथेच्या प्रारूपापासून फारकत घेण्यासंदर्भातील या विषयावर आपल्या स्तरावर विचार विनिमय करून सर्व संबंधितांना योग्य सूचना/मार्गदर्शक तत्वे देऊन शपथ विधी प्रक्रियेचे पावित्र्य जतन करण्याची विनंती राज्यपालांनी आपल्या पत्राद्वारे उभय पीठासीन अधिकार्‍यांना केली आहे.  

Web Title: fix advisory for all ministers and members in the context of oath taking governor writes to vice president and lok sabha speaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.