बिघाड दुरूस्त, म.रेची वाहतूक सुरू

By admin | Published: March 4, 2016 11:23 AM2016-03-04T11:23:45+5:302016-03-04T12:14:23+5:30

दिवा स्थानकाजवळ अप मार्गावरील लोकलच्या पेंटाग्राफमध्ये झालेला बिघाड दुरूस्त करण्यात आला असून मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे.

Fix the fault, start driving traffic | बिघाड दुरूस्त, म.रेची वाहतूक सुरू

बिघाड दुरूस्त, म.रेची वाहतूक सुरू

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - दिवा स्थानकाजवळ अप मार्गावरील लोकलच्या पेंटाग्राफमध्ये झालेला बिघाड दुरूस्त करण्यात आला असून मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे.
शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास दिवा स्थानकाजवळ अप मार्गावरील लोकलच्या पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.  डोंबिवलीहून मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने निघालेल्या स्लो लोकलच्या पेंटोग्राफमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने लोकल दिवा स्थानकाजवळ ठप्प झाली. त्यामुळे स्लो मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद पडली आणि अनेक लोकल्सची एकामागोमाग एक अशी मोठी रांग लागली. या बिघाडामुळे अनेक स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने चाकरमान्यांचे मोठे हाल झाले. 
रेल्वे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून बिघाड दुरूस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले.
 

Web Title: Fix the fault, start driving traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.