‘आयटीआय’ प्रवेशासाठी झुंबड
By admin | Published: July 12, 2014 11:44 PM2014-07-12T23:44:50+5:302014-07-12T23:44:50+5:30
राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मध्ये प्रवेशासाठी विद्याथ्र्याची मोठी पसंती मिळत असल्याचे चित्र आहे.
Next
पुणो : राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मध्ये प्रवेशासाठी विद्याथ्र्याची मोठी पसंती मिळत असल्याचे चित्र आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यापासून पाच दिवसांत राज्यात तब्बल सव्वालाख विद्याथ्र्यानी प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. नोंदणी तसेच संस्थेत अर्ज सादर करण्यासाठी अजून दहा दिवसांची मुदत असल्याने नोंदणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील 98 हजार 65 जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.
राज्यात सध्या अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्र शाखांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियाही सुरू आहेत. मात्र, या अभ्यासक्रमांच्या हजारो जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. मागील काही वर्षापासून रिक्त राहणा:या जागांचे प्रमाण वाढतच चालले आहे. ‘आयटीआय’च्या बाबतीत चित्र उलटे दिसत आहे. ‘आयटीआय’मधील विविध ट्रेडला आठवी व दहावीनंतर प्रवेश दिला जातो. स्वत:चा व्यवसाय किंवा उद्योग क्षेत्रतही ‘आयटीआय’चे प्रमाणपत्रप्राप्त विद्याथ्र्याना नोक:या मिळतात. त्यामुळे अजूनही ‘आयटीआय’ मोठय़ा प्रमाणावर पसंती मिळताना दिसत आहे.
राज्यात शासकीय ‘आयटीआय’च्या एकूण 98 हजार 65 जागा आहेत. त्यावर प्रवेशासाठी 8 जुलैपासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणो, व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प सादर करणो, अर्जात दुरुस्ती करणो व प्रवेश अर्ज शुल्क शासकीय ‘आयटीआय’मध्ये जमा करणो ही प्रक्रिया सध्या सुरू आहे. येत्या 22 जुलैर्पयत विद्याथ्र्याना यात सहभागी होता येईल. या प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन नोंदणी करून अर्ज भरलेल्या विद्याथ्र्याची संख्या सुमारे 1 लाख 23 हजार एवढी आहे. तर सुमारे 39 हजार विद्याथ्र्यानी प्रवेश अर्ज शुल्क भरले आहेत. अर्ज करण्यासाठी अजूनही दहा दिवसांचा कालावधी आहे. या काळातही विद्यार्थी ऑनलाईन अर्ज भरू शकतात. त्यामुळे हा आकडा आणखी वाढू शकतो. येत्या 24 जुलै रोजी प्रवेशाची प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. (प्रतिनिधी)
‘आयटीआय’ला नेहमीच मागणी जास्त असते. उपलब्ध जागांपेक्षा दर वर्षी दुप्पट अर्ज येत असतात. यंदाही हेच चित्र पाहायला मिळेल. विशेषत: अभियांत्रिकी गटातील इलेक्ट्रिशियन, फिटर, टर्नर, मशिनरी, मोटार मेकॅनिक, वेल्डर या व्यवसायांना विद्याथ्र्याकडून जास्त पसंती दिली जाते.
- चंद्रकांत निनाळे, विभागीय सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय
‘एमबीए’ची प्रवेश क्षमता कळणार आज
4एमबीए अभ्यासक्रमाची राज्यातील केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतील एकूण प्रवेशक्षमता रविवारी स्पष्ट होणार आहे. तंत्र शिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर ही संस्थानिहाय माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे. सोमवारपासून ऑनलाईन पर्याय अर्ज भरता येईल.