Flood: मानवी चुका, अलमट्टीचा महापुराशी संबंध नाही; पूरग्रस्तांना राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 07:28 AM2021-07-27T07:28:15+5:302021-07-27T07:29:56+5:30

व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिल्यास त्यांच्या पुनर्वसनासाठीही शासन प्रयत्नशील आहे. पुराचा फटका बसलेल्या संपूर्ण भागाचा आढावा घेतल्यानंतर दोन दिवसांत मदतीबाबत घोषणा करण्यात येईल

Flood: State government is providing all possible assistance to the flood victims Ajit Pawar | Flood: मानवी चुका, अलमट्टीचा महापुराशी संबंध नाही; पूरग्रस्तांना राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदत

Flood: मानवी चुका, अलमट्टीचा महापुराशी संबंध नाही; पूरग्रस्तांना राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदत

Next
ठळक मुद्देपाण्याचा विसर्ग व त्याचा फुगवटा होणार नाही यासाठी जलसंपदा विभाग प्रयत्न करत होता. अलमट्टीमधून विसर्गावर लक्ष ठेवण्यासाठी राज्य शासनाने एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे.एनडीआरएफच्या धर्तीवर एक तुकडी करून तिचे केंद्र कराड येथे करण्याबाबत राज्य सरकारचा विचार सुरू

सांगली : सांगली, कोल्हापूरला बसलेला महापुराचा फटका आणि कर्नाटकातील अलमट्टी धरणाचा फुगवटा याचा काहीही संबंध नाही. यात मानवी चुकाही झालेल्या नाहीत. शंभर वर्षांत झाला नाही इतका पाऊस एकावेळी कोयना, नवजा परिसरात झाला. या विक्रमी पावसाची जबर किंमत आपल्याला मोजावी लागली, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी दिली. शेतकरी, व्यापाऱ्यांसह सर्व घटकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही, असा विश्वासही त्यांनी पूरग्रस्तांच्या भेटीदरम्यान दिला. 
सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार सोमवारी जिल्हा दौऱ्यावर होते. पवार म्हणाले, पाण्याचा विसर्ग व त्याचा फुगवटा होणार नाही यासाठी जलसंपदा विभाग प्रयत्न करत होता. अगदी अलमट्टीमधून विसर्गावर लक्ष ठेवण्यासाठी राज्य शासनाने एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिल्यास त्यांच्या पुनर्वसनासाठीही शासन प्रयत्नशील आहे. पुराचा फटका बसलेल्या संपूर्ण भागाचा आढावा घेतल्यानंतर दोन दिवसांत मदतीबाबत घोषणा करण्यात येईल.

पूरग्रस्त नागरिक, व्यापाऱ्यांना दिलासा

अजित पवारांनी जिल्ह्यात सोमवारी दुपारी सुरुवातीला पलूस तालुक्यातील माळवाडीत पूरग्रस्त भागाची पाहणी करून निवारा केंद्रातील नागरिकांशी संवाद साधला. भिलवडीत पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी मिरज तालुक्यातील कवलापूर येथे निवारा केंद्रास तसेच सांगलीतील पूरग्रस्त भागास, पूरग्रस्त निवारा केंद्रास भेट दिली. 

एनडीआरएफच्या धर्तीवर तुकडीचा विचार
एनडीआरएफच्या धर्तीवर एक तुकडी करून तिचे केंद्र कराड येथे करण्याबाबत राज्य सरकारचा विचार सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. चक्रीवादळाचा फटका बसला तेव्हा अडीचपट जादाची मदत करण्यात आली. तशीच मदत आताही पूरग्रस्तांना करण्यात येईल. राज्य सरकार जबाबदारी घेईलच; पण केंद्र सरकारनेही जबाबदारी घ्यावी, असे पवार म्हणाले.

कोल्हापूरचा विळखा सैल
कोल्हापुरातील महापुराचा विळखा सैल झाला असून, मदतकार्याला वेग आला आहे. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांसाठी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. पाऊस थांबल्याने पूर ओसरेल तसे घराघरात, दुकानात स्वच्छतेची कामेही युद्धपातळीवर सुरु आहेत. सोमवारी पाऊस पूर्णपणे उघडला व कडकडीत ऊन पडले होते. 

 

Web Title: Flood: State government is providing all possible assistance to the flood victims Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.