जळगाव जिल्ह्यातील चहार्डी गावात पूरस्थिती

By Admin | Published: June 29, 2016 08:50 AM2016-06-29T08:50:36+5:302016-06-29T08:50:36+5:30

जळगाव जिल्ह्यातील चहार्डी गावात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. येथील झाडवन चौकातील उभ्या असलेल्या जवळपास ११ रिक्षा वाहून गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Flooding in Chhurdi village of Jalgaon district | जळगाव जिल्ह्यातील चहार्डी गावात पूरस्थिती

जळगाव जिल्ह्यातील चहार्डी गावात पूरस्थिती

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत 

जळगाव, दि. २९ - जळगाव जिल्ह्यातील चहार्डी गावात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. येथील झाडवन चौकातील उभ्या असलेल्या जवळपास ११ रिक्षा वाहून गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चहार्डी येथील चंपावती आणि रत्नावती नदीच्या संगमा पुढे असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यात कचरा अडकल्याने गावात पाणी शिरले आहे. 
 
अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे.  सर्वत्र पाणीच पाणी अशी गावात स्थिती आहे. पूराच्या पाण्यामुळे मालमत्तेचे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे चोपडा शिरपूर रस्ता बंद झाला असून, काजीपूरा जवळ पुलाचा भराव वाहून गेला आहे. 
 

Web Title: Flooding in Chhurdi village of Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.