विमानतळाचा मार्ग मोकळा

By admin | Published: June 27, 2014 01:21 AM2014-06-27T01:21:59+5:302014-06-27T01:21:59+5:30

आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित होणा:या दहा गावांतील बहुतांशी ग्रामस्थांनी शासनाने मंजूर केलेल्या सिडकोच्या पुनर्वसन पॅकेजला मंजुरी दिली आहे.

Fly the route to the airport | विमानतळाचा मार्ग मोकळा

विमानतळाचा मार्ग मोकळा

Next
>नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित होणा:या दहा गावांतील बहुतांशी ग्रामस्थांनी शासनाने मंजूर केलेल्या सिडकोच्या पुनर्वसन पॅकेजला मंजुरी दिली आहे. त्यामुळे विमानतळाच्या उभारणीच्या मार्गातील प्रमुख अडसर दूर 
झाला आहे. त्यानुसार सिडकोने पुनर्वसनाची कार्यवाही सुरू केली असून प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणा:या 22.5 टक्के भूखंड वाटप योजनेची पहिली लॉटरी 15 ऑगस्ट रोजी काढण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. 
 आतार्पयत जवळपास बाधित होणा:या गावांतील जवळपास 90 टक्के घरांच्या  सव्रेक्षणाचे काम पूर्ण केले आहे. पुनर्वसन पॅकेजला विरोध दर्शविणा:या वरचा ओवळा आणि कोली गावातील ग्रामस्थांनीही सव्रेक्षणास सहमती दर्शविली आहे. तसेच पारगाव आणि पारगांव डुंगी गावातील ग्रामस्थांनी पुनर्वसन पॅकेजला अनुकूलता दर्शविली आहे. त्यामुळे उर्वरित गावांचे सव्रेक्षणही लवकरच पूर्ण केले जाईल, अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी  
पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदूराव आणि संचालक नामदेव भगत आदी   उपस्थित होते.
संपादित करण्यात येणा:या भूखंडाच्या बदल्यात नुकसान भरपाई म्हणून प्रकल्पग्रस्तांना दापोली येथील प्रस्तावित पुष्पकनगरमध्ये 22.5 टक्के विकसित भूखंड देण्यात येणार आहे. ‘प्रथम येईल  त्यास प्राधान्य’ या तत्त्वावर या भूखंड वाटप योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ 15 ऑगस्टला करण्यात येणार आहे. 22.5 टक्के भूखंडासाठी सध्या 70 ग्रामस्थांचे संमतीपत्र सिडकोला प्राप्त झाले आहे. येत्या 23 जुलैर्पयत संमतीपत्र व आवश्यक कागदपत्रे 
सादर करणा:या पात्र भूधारकांचाही या पहिल्या सोडत प्रक्रियेत समावेश करण्यात येणार असल्याची माहिती सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनी दिली. (प्रतिनिधी)
 
च्भूसंपादनासाठी संमतीपत्र देणा:या भूधारकांना 22.5 टक्के योजनेअंतर्गत भूखंड मिळण्याच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने सिडकोच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेसाठी अवलंबिण्यात येणा:या कार्यपद्धतीचे पत्रक तयार करण्यात आले असून, ते प्रत्येक गावात वाटण्यात येणार आहे. तसेच या प्रक्रियेसाठी सीबीडी येथे स्वतंत्र केंद्र सुरू करण्यात येणार असून, 1 जुलै रोजी त्याचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
 
च्शासनाने मंजूर केलेल्या सिडकोच्या पुनर्वसन पॅकेजला प्रकल्पबाधित ग्रामस्थांच्या प्रखर विरोधामुळे विमानतळाचा प्रकल्प अडचणीत सापडला होता. मात्र सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया आणि सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनी विविध स्तरावर ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यांना पुनर्वसन पॅकेजविषयी सविस्तर माहिती दिली. याचा परिणाम म्हणून आज जवळपास बहुतांशी ग्रामस्थांचा विरोध मावळला. त्यामुळे विमानतळाच्या मार्गातील मोठा अडसर दूर झाला आहे.

Web Title: Fly the route to the airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.