गुहागरमध्ये जाळ्यात अडकला 'उडणारा मासा'

By admin | Published: December 24, 2016 11:58 AM2016-12-24T11:58:56+5:302016-12-24T11:58:56+5:30

मासेमारी करायला गेलेल्या मच्छिमारांच्या जाळ्यात चक्क उडणारा मासा अडकला आहे

'Flying Fish' caught in a trap at Guhagar | गुहागरमध्ये जाळ्यात अडकला 'उडणारा मासा'

गुहागरमध्ये जाळ्यात अडकला 'उडणारा मासा'

Next
>ऑनलाइन लोकमत
रत्नागिरी, दि. 24 - मासेमारी करायला गेलेल्या मच्छिमारांच्या जाळ्यात चक्क उडणारा मासा अडकला आहे. शक्यतो हे फ्लाईंग फिश मच्छिमारांच्या जाळ्यात अडकत नाहीत. पण असगोली येथील मच्छिमारांना हे मासे सापडले आहेत. 
असगोली येथील मच्छिमार पहाटे तीन वाजता मच्छिमारीसाठी गेले होते. यावेळी जाळ्यात सापडलेल्यांपैकी जिवंत मासे त्यांनी पाण्यात ठेवून दिले होते. रानवी ते असगोली या परिसरात समुद्रात मासेमारी करताना मच्छिमारांच्या जाळ्यात पंख असलेले दोन मासे सापडले. परतल्यावर त्यांनी माश्यांना पंख असल्याचं उपस्थित पर्यटकांनाही दाखवलं. त्यानंतर या माशांना पुन्हा पाण्यात सोडून जीवनदान देण्यात आलं.
 

Web Title: 'Flying Fish' caught in a trap at Guhagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.