उड्डाणपुलाच्या खांबाला धोका

By admin | Published: July 12, 2017 01:14 AM2017-07-12T01:14:37+5:302017-07-12T01:14:37+5:30

सोलापूर रस्त्यावरील मगरपट्टा चौकातील उड्डाणपुलाच्या पिलरला (खांब) अवजड वाहनांच्या धडकेमुळे धोका निर्माण झाला आहे

Flyover pole risk | उड्डाणपुलाच्या खांबाला धोका

उड्डाणपुलाच्या खांबाला धोका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हडपसर : सोलापूर रस्त्यावरील मगरपट्टा चौकातील उड्डाणपुलाच्या पिलरला (खांब) अवजड वाहनांच्या धडकेमुळे धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी गाडीतळावरील पुलालाही अशा प्रकारचा धोका होता. त्यावर पालिकेने रस्त्यावर पिलरच्या बाजूला दुभाजक टाकल्याने जास्त उंचीची वाहने पुलाच्या बाजूने जात नसल्याने पिलरला ती धडकत नाहीत. अशीच उपाययोजना या पुलांच्या पिलरच्या बचावासाठी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.
जमिनीपासून पिलरची उंची कमी असल्याने अवजड वाहने धडक देतात. परिणामी, पुलाला सारखे हादरे बसत आहेत. गाडीतळावरील पुलाच्या पिलरला असाच धोका निर्माण झाला असता, पालिकेने त्या पिलरच्या खाली रस्त्यावर दुभाजक टाकले. त्यामुळे तेथून धडकणाऱ्या वाहनांना जाता येत नाही. तशीची व्यवस्था येथे करावी लागेल, तरच या पिलरचे होणारे नुकसान थांबेल. त्यामुळे अशी दुरुस्ती दुभाजक टाकून पालिकेने करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
>पिलरचे गज बाहेर
पुण्याकडून हडपसरकडे व मुंढवा रस्त्यावरून हडपसरकडे येणारी वाहने या पुलाच्या पिलरला धडक देतात. ज्या वाहनांची उंची जास्त आहे अशी अवजड वाहने पुलाच्या बाजूने जाताना पुलाच्या खाली असलेल्या आडव्या पिलरला धडकल्याने त्याचे सिमेंट निघून जात आहे. या पिलरमधील लोखंडी गज आता दिसू लागले आहेत.

Web Title: Flyover pole risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.