ठाणे मध्यवर्ती कारागृहात सुरू होणार एफएम रेडिओ स्टेशन

By admin | Published: June 24, 2016 06:10 PM2016-06-24T18:10:35+5:302016-06-24T18:19:37+5:30

ठाणे मध्यवर्ती कारागृहात लवकरच एफएम रेडिओ स्टेशन सुरू करण्यात येणार आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (दि.२३) तुरुंगाला भेट दिली.

FM Radio Station to be launched in Thane Central Jail | ठाणे मध्यवर्ती कारागृहात सुरू होणार एफएम रेडिओ स्टेशन

ठाणे मध्यवर्ती कारागृहात सुरू होणार एफएम रेडिओ स्टेशन

Next
>ऑनलाइन 
ठाणे, दि. २४ -  ठाणे मध्यवर्ती कारागृहात लवकरच एफएम रेडिओ स्टेशन सुरू करण्यात येणार आहे. 
ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (दि.२३) तुरुंगाला भेट दिली. यावेळी  कारागृहात असणारे कैदी या रेडिओ स्टेशनमध्ये रेडिओ जॉकीचे काम करणार असल्याची माहिती तुरुंग अधीक्षक हिरालाल जाधव यांनी दिली.
एकनाथ शिंदे यांनी कारागृहातील रेडिओ स्टेशनसाठीच्या प्रस्तावित जागेची यावेळी पाहणी केली. येत्या १५ दिवसांत याठिकाणी एफएम रेडिओ स्टेशन्स सरु करण्यात येणार आहे. तसेच, या एफएम रेडिओ स्टेशन्सचे उद्घाटन करण्यासाठी अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते करण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचेही जाधव यांनी यावेळी सांगितले.

Web Title: FM Radio Station to be launched in Thane Central Jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.