आदिवासी विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी शाळांवर भर

By admin | Published: March 18, 2017 02:25 AM2017-03-18T02:25:17+5:302017-03-18T02:25:17+5:30

नव्या शैक्षणिक सत्रात आदिवासी विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे, यासाठी राज्य शासनाने २५ हजार विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांमध्ये दर्जेदार

Focus on English schools for tribal students | आदिवासी विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी शाळांवर भर

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी शाळांवर भर

Next

अमरावती : नव्या शैक्षणिक सत्रात आदिवासी विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे, यासाठी राज्य शासनाने २५ हजार विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता १८६ प्रस्ताव प्राप्त झाले असून, समिती गठीत करण्यात आली आहे.
ठाणे, नाशिक, अमरावती व नागपूर अपर आयुक्त कार्यालयांतर्गत विद्यार्थी प्रवेशाचे ‘टार्गेट’ आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तांनी निश्चित केले आहे. यापूर्वी यासाठी १६२ नामांकित शाळांची निवड करण्यात आली आहे. मात्र, अधिकाअधिक आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांमध्ये शिक्षण देता यावे, यासाठी नव्याने शाळानिवडीची प्रक्रिया सुरू केली आहे. विशेषत: शाळानिवडीची जबाबदारी आयएएस अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

नव्या सत्रात आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांमध्ये प्रवेश देता यावा, याअनुषंगाने शाळांची निवड केली जाणार आहे. चारही अपर आयुक्त कार्यालयस्तरावर महिनाभराच्या आत ही प्रकिया पार पाडली जाईल.
- राजीव जाधव, आयुक्त,
आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र

Web Title: Focus on English schools for tribal students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.