गरज असेपर्यंत चारा छावण्या सुरु रहातील - देवेंद्र फडणवीस
By admin | Published: March 4, 2016 06:01 PM2016-03-04T18:01:49+5:302016-03-04T18:01:49+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतक-यांना बसणारी दुष्काळाची झळ कमी व्हावी यासाठी राज्य सरकारने केलेल्या विविध उपायोजना आणि निर्णयाची शुक्रवारी माहिती दिली.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - राज्याच्या दुष्काळी भागाच्या दौ-यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतक-यांना बसणारी दुष्काळाची झळ कमी व्हावी यासाठी राज्य सरकारने केलेल्या विविध उपायोजना आणि निर्णयाची शुक्रवारी माहिती दिली. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच चारा छावण्यास ऑक्टोंबर महिन्यात सुरु झाल्या आणि शेतक-यांना गरज असेपर्यंत त्या सुरु रहातील असे सांगितले.
दोन वर्षात आम्ही शेतक-यांसाठी १८ हजार कोटींची तरतूद केली. मागच्या पंधरावर्षात शेतक-यांसाठी फक्त आठ हजार कोटींची तरतूद झाली होती असे फडणवीस यांनी सांगितले. ज्या गावांमध्ये पाण्याची गरज आहे त्या गावांमध्ये सरकार टॅंकरच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करत आहे असे फडणवीस यांनी सांगितले.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पाच लाख लोकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला. आम्ही ४० कोटी रुपयांचे शिक्षण शुल्क माफ केले ज्याचा १० लाख विद्यार्थ्यांना फायदा झाला असे फडणवीस यांनी सांगितले. शेतक-यांना मोठया प्रमाणावर आर्थिक मदत केल्यानंतर शेतक-यांना शेत तळी देण्याची योजना सरकारने आणली आहे.
मनरेगाच्या माध्यमातून ही योजना कार्यान्वित केली जाईल. तीन दिवसात २४ हजार शेतक-यांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे असे फडणवीस यांनी सांगितले. तसेच ज्या शेतक-यांनी पीकविमा घेतलेला नाही, त्यांनापण मदत करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून बाधित शेतक-यांच्या बँक खात्यामध्ये थेट मदत जमा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
First time in the history of state,fodder camps are set up in the month of Oct & will continue to be there till needed: CM @Dev_Fadnavis
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 4, 2016
We have issued orders to give relief to those farmers too,who haven't applied for insurance,help be deposited directly in bank account: CM
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 4, 2016