धुक्याच्या धास्तीने ट्रेनच्या फेऱ्या रद्द
By admin | Published: September 12, 2015 02:15 AM2015-09-12T02:15:26+5:302015-09-12T02:15:26+5:30
डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान उत्तर भारतात पडणाऱ्या थंडीचा रेल्वेकडून धसका घेण्यात आला आहे. रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशानुसार मेल-एक्सप्रेसच्या गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये
मुंबई : डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान उत्तर भारतात पडणाऱ्या थंडीचा रेल्वेकडून धसका घेण्यात आला आहे. रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशानुसार मेल-एक्सप्रेसच्या गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये बदल करत त्यात कपातही करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ८ जानेवारी २०१६ ते २९ फेब्रुवारी २०१६ पर्यंत याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवरील १९ तर मध्य रेल्वेवरील ३0 गाड्यांचा यात समावेश असल्याची माहिती देण्यात आली. पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेन्ट्रल येथून सुटणाऱ्या मुंबई राजधानी, आॅगस्ट क्रांती राजधानी, गोल्डन टेम्पल, फिरोजपूर जनता एक्सप्रेस, वांद्रे टर्मिनस येथून सुटणाऱ्या गरीब रथ, दिल्ली एस रोहिल्ला, पश्चिम एक्सप्रेस, डेहराडून एक्सप्रेस, अवध एक्सप्रेसचा समावेश आहे. त्याचप्रमाणे मध्य रेल्वेवरील एलटीटीहून सुटणाऱ्या कुशीनगर एक्सप्रेस,गोदान एक्सप्रेस,मुझफ्फरपुर एक्सप्रेस, दरभंगा, कामयानी, ज्ञानेश्वरी, राजेन्द्र नगर, वाराणसी तर सीएसटीहून अमृतसर, महानगरी, कोलकोत्ता, पुष्पक एक्सप्रेसचा समावेश आहे. या ट्रेनच्या प्रत्येकी एक ते दोन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. याची माहिती पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या वेबसाईटवरही देण्यात आली आहे.