खंडपीठासाठी पाठपुरावा करू
By admin | Published: May 17, 2015 12:57 AM2015-05-17T00:57:55+5:302015-05-17T00:57:55+5:30
मुंबई उच्च न्यायालयचे खंडपीठ पुण्यात व्हावे, या वकिलांच्या मागणीला आपला पाठिंबा असून, त्यासाठी पाठपुरावा करणार आहोत.
पुणे : मुंबई उच्च न्यायालयचे खंडपीठ पुण्यात व्हावे, या वकिलांच्या मागणीला आपला पाठिंबा असून, त्यासाठी पाठपुरावा करणार आहोत. खंडपीठासाठी लागणारी जागा आपण उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन पुण्याचे पालक मंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी दिले.
मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच पुण्यात व्हावे, यासाठी मंत्रिमंडळात शिफारस केल्याप्रकरणी शनिवारी पुणे बार असोसिएशनतर्फे जिल्हा न्यायालयातील अशोक हॉल येथे गिरीश बापट यांचा सत्कार करण्यात आला. प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. एस. के. जैन अध्यक्षस्थानी होते. जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. गिरीश शेडगे, उपाध्यक्ष अॅड. हेरंब गानू, अॅड. योगेश पवार, सचिव राहुल झेंडे, अॅड. सुहास फराडे या वेळी उपस्थित होते.
बापट म्हणाले, ‘‘मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ मिळावे म्हणून पुणे आणि कोल्हापूरकडून मागणी करण्यात येत होती. कोल्हापूरला सर्किट बेंच देण्याचा ठराव मंत्रिमंडळात करण्यात आला. पुण्याला खंडपीठ मिळावे, यासाठी पाठपुरावा करणार असून, त्यासाठी लागणारी जागा उपलब्ध करून देणार आहोत. पुणे जिल्हा न्यायालयातील प्रश्न आपल्याकडे मांडण्यात आले असून, ते मार्गी लावण्यासाठी लागेल ती मदत करू. शासकीय गोदामाची जागा देण्याची मागणी, न्यायालयाच्या इमारतीची देखभाल, ग्रंथालय या प्रश्नांकडे लक्ष देणार आहे.’’
न्यायालयातील लॉकअपची आपण पाहणी केली असून, न्यायालयात आणलेल्या आरोपींना त्यांचे कोणी नातेवाईक भेटणार नाहीत या संदर्भात कारवाई करण्याच्या सूचना करणार आहोत, असे बापट यांनी सांगितले. यावेळी सरकारी वकिलांनी ही आपल्या समस्यांचे निवदेन दिले.
च्नवीन कायदे तयार करताना त्यावर चर्चा होते. आपल्याकडे नवीन कायदे तयार करताना त्याचे भविष्यातील दूरगामी परिणाम काय असतील, यावर चर्चा होत नाही.
च्सर्वच राजकीय पक्षांतील लोक कायदे तयार करताना उदासीन असतात. या वेळी बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य अॅड. हर्षद निंबाळकर आणि अॅड. विजय सावंत यांनी खंडपीठाच्या मागणीसंदर्भात आपले व्यक्त केले.