लाईट बिल जास्त येतं? कमी करण्यासाठी या टीप्स फॉलो करा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 05:13 PM2022-09-28T17:13:32+5:302022-09-28T17:27:34+5:30
मान्सूनने आता परतीची वाट पकडली आहे. काही दिवसातच ऑक्टोबर हिट सुरू होणार असून, या महिन्यात तापमानात लक्षणीय वाढ होत असते. त्यामुळे घरातील फॅन, एसी या उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत असतो.
मुंबई: मान्सूनने आता परतीची वाट पकडली आहे. काही दिवसातच ऑक्टोबर हिट सुरू होणार असून, या महिन्यात तापमानात लक्षणीय वाढ होत असते. त्यामुळे घरातील फॅन, एसी या उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत असतो. त्यामुळे वीज बिलातही मोठ्या प्रमाणात वाढ होते.अशा परिस्थितीत आपल्याला वीज बिल कमी हवे असते. घरातील सर्व उपकरणे वापरुन वीज बिल कसे कमी करावे याच्या टीप्स अदाणी इलेक्ट्रिसिटीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिल्या आहेत.
ऑक्टोबर महिन्यापासून एसी, फ्रीज, फॅन या उपकरणांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असतो.ही उपकरणे वापरल्यामुळे आपली वीज बिले मोठ्या प्रमाणात येत असतात.जर आपण ही उपकरणे वापरताना कळजी घेतली तर आपले वीज बिल कमी येऊ शकते.यासाठी आपण अशी उपकरणे वापरत असताना अधिक जागरूक राहणे आवश्यक आहे. यासाठी काही आवश्यक टीप्स वीज ग्राहकांनी अनुसरायला हव्यात. चला तर मग या टीप्स काय आहेत जाणून घेऊया.
Passport Apply : पोस्ट ऑफिसद्वारे झटपट बनवता येणार पासपोर्ट! जाणून घ्या, संपूर्ण प्रोसेस...
एसी
उन्हाळ्यात आपल्याकडे एसी नेहमी चालू ठेवावा लागतो. एसीमुळे आपले वीज बिल मोठ्या प्रमाणात येऊ शकते. पण जर तुम्ही एसी योग्य पद्धतीने वापरला तर तुमचे वीज बिल कमी येऊ शकते. एसी नेहमी २४ अंशांवर ठेवावे. हे एक योग्य तापमान असून प्रत्येक अंश कमी झाल्यास ५% अतिरिक्त वापर होतो.
फाईव्ह स्टार
आपण फॅन, एसी अशी उपकरणे खरेदी करत असताना ती उपकरणे नेहमी ५-स्टार मानांकन आहेत का पाहून खरेदी करावीत. एसी/रेफ्रिजरेटर/फॅन ही उपकरणे खरेदी करत असताना यांनाच त्यावर फाईव्ह स्टार आहेत हे प्राधान्याने पाहायला हवे.कारण ते अधिक ऊर्जा कार्यक्षम आहेत.तसेच ते उत्तमदेखील आहे.
उपकरणांची देखभाल
विद्युत उपकरणांची नियमित देखभाल ही एक गुरुकिल्ली आहे. तुमच्या एसीमुळे अनावश्यक वीजेचा वापर तर होत नाही ना याची खात्री करण्यासाठी नियमितपणे त्याची देखभाल व दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
मोबाइलवर गेम खेळाणाऱ्यांना बसणार मोठा झटका! बंद होणार कमाईची सर्व मार्ग
ऊर्जेचा अपव्यय टाळा
ऊर्जेचा अपव्यय टाळा, तुमचा एसी सुरू असताना खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवा. रेफ्रिजरेटरचे दार सतत उघड वा बंद करू नका, किंवा ते अधिक वेळेसाठी उघडे ठेवू नका.