झारखंडाच्या संघावर फॉलोऑनची नामुश्की, सर्वबाद १७० धावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 11:07 PM2020-01-13T23:07:24+5:302020-01-13T23:07:34+5:30
दुसऱ्या डावात १ बाद ४७ : विजयासाठी महाराष्ट्राला नऊ बळींची गरज
नागोठणे : महाराष्ट्राच्या मुकेश चौधरी आणि डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छाव यांनी झारखंडाच्या फलंदाजाचे बळी मिळविल्याने झारखंडची सर्वबाद १७० अशी परिस्थिती केल्याने झारखंडवर फॉलोआॅनची नामुष्की ओढवली. तिसºया दिवसाचा खेळ संपला तेव्हा दुसºया डावात झारखंड १ बाद ४७ धावांवर खेळत असून डावाच्या पराभवापासून वाचण्यासाठी झारखंड अजूनही २१७ धावांनी पिछाडीवर आहे. विजय मिळविण्यासाठी महाराष्ट्राला अजून नऊ बळी मिळविणे गरजेचे आहे. उद्या शेवटचा दिवस आहे.
रविवारी दुसºया दिवसाचा खेळ संपला तेंव्हा झारखंडची २ बाद २ अशी अवस्था होती. सोमवारी सकाळी सलामीवीर नाझीम आणि कर्णधार सौरभ तिवारी मैदानावर उतरले असता, संघाच्या २१ धावा फलकावर लागल्या असता नाझीम १३ धावा काढून बाद झाला. त्यानंतर तिवारी याच्या जोडीला आलेल्या विराट सिंगने झुंज देत चौथ्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी केली. संघाच्या १२० धावा झाल्या असताना विराट सिंग ४३ धावा काढून बाद झाला. याच धावसंख्येवर पाचवाही बळी गेल्याने ५ बाद १२० धावा अशी झारखंडची परिस्थिती झाली होती.
एका धावसंख्येची वाढ झाल्यावर सहावी विकेट १२१ वर पडली, तर एकाकी झुंज देत असलेला कर्णधार सौरभ तिवारी ६२ ची सातवी विकेट १३३ वर पडल्याने उर्वरित चार फलंदाजांनी ३७ धावांची भर टाकल्याने झारखंडचा पहिला डाव १७० धावांमध्ये संपुष्टात आला. यात सत्यजित बच्छावने ५, मुकेश चौधरी ३ आणि अझीम काझीने २ बळी घेतले. फॉलोआॅन मिळाल्याने दुसºया डावात खेळावयास आलेल्या कुमार देवव्रत याने संघाच्या २१ धावा झाल्या असताना बच्छावच्या गोलंदाजीवर मुकेश चौधरीच्या हातात झेल दिल्याने तो १० धावा काढून बाद झाला. तिसºया दिवसाचा खेळ संपला तेंव्हा मोहम्मद नाझीम २३ आणि उत्कर्ष सिंग १२ धावांवर खेळत आहेत. विजय मिळविण्यासाठी महाराष्ट्राला अजून नऊ बळी मिळविणे गरजेचे आहे.
झारखंड (पहिला डाव)
कुमार देवव्रत झे. नौशाद शेख गो. मुकेश चौधरी ०
नाझीम झे. अझीम काझी गो. मुकेश चौधरी १३
उत्कर्ष सिंग झे. विशांत मोरे गो. मुकेश चौधरी ०२
सौरभ तिवारी झे. स्वप्नील गुगले गो. सत्यजित बच्छाव ६२
विराट सिंग झे. मनोज इंगळे गो. सत्यजित बच्छाव ४३
कुमार सुरज झे. गो. सत्यजित बच्छाव ०
सुमित कुमार झे. यश क्षीरसागर गो. अझीम काझी ०
अनुकूल रॉय झे. नौशाद शेख गो. सत्यजित बच्छाव ०९
वरुण एरॉन पायचीत गो. अझीम काझी ०२
अजय यादव झे. गुगले गो. सत्यजित बच्छाव २९
राहुल शुक्ला नाबाद २