निम्न पैनगंगा राष्ट्रीय प्रकल्प घोषित
By Admin | Published: October 5, 2015 03:21 AM2015-10-05T03:21:51+5:302015-10-05T03:21:51+5:30
निम्न पैनगंगा प्रकल्प हा आंतरराज्यीय प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे दोन्ही राज्यातील शेतकरी हा सुजलाम-सुफलाम होऊन स्वयंपूर्ण होऊ शकतो.
कराकिान्हाळगाव (कोरपना) : निम्न पैनगंगा प्रकल्प हा आंतरराज्यीय प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे दोन्ही राज्यातील शेतकरी हा सुजलाम-सुफलाम होऊन स्वयंपूर्ण होऊ शकतो. शेतीला पाणी ही आवश्यक गरज आहे. त्यामुळे सिंचनाचाही मोठा अनुशेष या प्रकल्पाच्या माध्यमातून दूर होऊ शकतो. यासाठी या प्रकल्पाच्या कामाला गती येऊन हा प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्यात यावा, असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी केले. ते कोरपना येथे विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या वतीने आयोजित शेतकरी मेळावा व पाणी परिषदेमध्ये बोलत होते.यिाप्रसंगी माजी खासदार नरेश पुगलिया, तेलंगणाचे माजी जलसंपदा मंत्री रामचंद्र रेड्डी, गडचिरोलीचे माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार प्रभाकर मामुलकर, आणीर्चे नगराध्यक्ष आरिफ बेग, छाया मडावी, आदिलाबादचे नगराध्यक्ष दिगंबर पाटील, नरसिंहराव, त्र्यंबक पाटील, बाळासाहेब मोघे, गजानन गावंडे, प्रकल्प संयोजक अँड.विजय घुले, डॉ.विजय देवतळे, अशोक नागापूरे, विजय पाटील, घनश्याम मुलचंदानी, अनकेश्वर मेश्रम, सुधा सिडाम, डॉ.अशोक राजूरकर आदी उपस्थित होते.मिोघे पुढे म्हणाले, या प्रकल्पासाठी 1970 पासून दोन्ही राज्यातील नागरिकांचा संघर्ष सुरू आहे. हा प्रकल्प 1985 मध्ये पूर्णत्वास येणो अपेक्षित असताना आजतागयत तो रेंगाळलेलाच आहे. दिवसेंदिवस या प्रकल्पाचाही खर्च वाढत चालला आहे. मात्र प्रकल्पाला चालना येऊ शकली नाही. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्णत्वास न आल्यास वेळप्रसंगी रस्त्यावरही उतरू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. निम्न पैनगंगा हा आंतरराज्यीय प्रकल्प असून 1975 च्या पाणी करारान्वये 88 टक्के पाणी महाराष्ट्राला तर 12 टक्के पाणी या प्रकल्पामुळे तेलंगणाला उपलब्ध होणार आहे.यिा प्रकल्पामुळे नांदेड, आदिलाबाद, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यातील 2 लाख 171 हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे. याचा सर्वाधिक लाभ हा कोरपना व राजुरा तालुक्यातील शेतकर्?यांना होणार आहे. यावेळी माजी खासदार नरेश पुगलिया, माजी मंत्री रामचंद्र रेड्डी, माजी खासदार मारोतराव कोवासे, प्रकल्प संयोजक अँड. विजय घुते, माजी आमदार प्रभाकर मामुलकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. परिषदेचे संचालन रमजान अली यांनी केले.किार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी घनश्याम नांदेकर, महेंद्र बोरा, प्रशांत लोडे, अविनाश गोवारकर, जमीरउल्ला बेग, शौकत अली, शाहीद अली, निसार शेख, फरहान शेख, आदींनी सहकार्य केले. (वार्ताहर)