आता खाऊगल्ल्यांना भेट देणार अन्नसुरक्षा अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 12:47 AM2018-06-07T00:47:07+5:302018-06-07T00:47:07+5:30
मुंबई असो वा पुणे कोणत्याही शहरात गेलो की, तेथील खाऊगल्ल्यांमध्ये मनसोक्त खाद्यभ्रंमती करतोच. मात्र आता याच खाऊगल्ल्यांमध्ये अन्नाची पडताळणी करण्यासाठी थेट राज्यभरातील अन्न सुरक्षा अधिकारी भेट देणार आहेत.
मुंबई : मुंबई असो वा पुणे कोणत्याही शहरात गेलो की, तेथील खाऊगल्ल्यांमध्ये मनसोक्त खाद्यभ्रंमती करतोच. मात्र आता याच खाऊगल्ल्यांमध्ये अन्नाची पडताळणी करण्यासाठी थेट राज्यभरातील अन्न सुरक्षा अधिकारी भेट देणार आहेत. या खाऊगल्ल्यांमधील अन्नाची तपासणी करून स्वच्छता व अन्न सुरक्षेचे निकष तपासून येथील ठिकाणांना अन्न व औषध प्रशासनाकडून ‘क्लीन फूड हब’चा दर्जा देण्यात येणार आहे.
मुंबई, पुणे, नागपूर या शहरांतील अनुक्रमे जुहू - गिरगाव चौपाटी, सारसबाग, पुताळा तलाव या ठिकाणी प्राथमिक टप्प्यांतील क्लीन फूड हबची तपासणी करण्यात येईल. बुधवारी वांद्रे येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत या नव्या उपक्रमाची घोषणा एफडीएने केली. गुरुवारी असणाऱ्या ‘जागतिक अन्न सुरक्षा दिना’निमित्त हा नवा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याप्रसंगी, एफडीए आयुक्त डॉ. पल्लवी दराडे, फूड सेफ्टी अॅण्ड स्टॅण्डर्ड आॅथॉरिटी आॅफ इंडियाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी पवन अग्रवाल यांनी या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली.
या उपक्रमाविषयी डॉ. दराडे म्हणाल्या, बहुतांश खाऊगल्ल्यांत स्वच्छतेचे निकष पाळले जात नाहीत. यासाठी संबंधित संघटनांशीही बोलणी केली जाईल.