सहकाराच्या पंढरीतही वारसदारच फडकरी!

By Admin | Published: February 7, 2017 11:44 PM2017-02-07T23:44:46+5:302017-02-07T23:44:46+5:30

सहकाराची पंढरी अशी ओळख असलेल्या नगर जिल्ह्यात दिग्गज नेत्यांनी दुसरी पिढी जिल्हा परिषद निवडणूक मैदानात उतरविली आहे़

In the foothills of the Sahara, the legacy of Fadkari! | सहकाराच्या पंढरीतही वारसदारच फडकरी!

सहकाराच्या पंढरीतही वारसदारच फडकरी!

googlenewsNext

सुधीर लंके, अहमदनगर
सहकाराची पंढरी अशी ओळख असलेल्या नगर जिल्ह्यात दिग्गज नेत्यांनी दुसरी पिढी जिल्हा परिषद निवडणूक मैदानात उतरविली आहे़
विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या पत्नी शालिनी विखे काँग्रेसकडून, शेवगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार नरेंद्र घुले यांचे चिरंजीव डॉ़ क्षितिज घुले, तर चंद्रशेखर घुले यांच्या पत्नी राजश्री यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली आहे़ नेवाशाचे भाजपाचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या पत्नी आशा या भाजपाकडून उमेदवारी करीत आहेत. तर माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या पत्नी सुनीता या आघाडीकडून नेवाशातून निवडणूक लढवित आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे यांच्या पत्नी प्रभावती या पाथर्डीतून तर राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या कन्या तेजश्री लंघे नेवासा तालुक्यातून निवडणूक लढवित आहेत़ संगमनेरमध्ये थोरात सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माधवराव कानवडे यांचे चिंरजीव मिलिंद यांना उमेदवारी देण्यात आली आहे़ श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांची सून वंदना ज्ञानेश्वर मुरकुटे, भाजपाचे माजी आमदार राजीव राजळे यांचे बंधू राहुल, नगर तालुक्यातील माजी खासदार दादा पाटील शेळके यांचे पुतणे प्रताप शेळके निवडणूक मैदानात आहेत़ सेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांची सून वंदना लोखंडे जामखेडमधून उमेदवारी करीत आहे़ राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अरुण जगताप यांच्या सूनबाई सुवर्णा सचिन जगताप श्रीगोंद्यातून उमेदवारी करीत आहेत. पारनेरमधून राष्ट्रवादीचे माजी आमदार स्व. वसंतराव झावरे यांच्या पत्नी सुप्रिया तर चिरंजीव सुजीत हे निवडणूक लढवित आहेत. श्रीगोंद्याचे राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांच्या मातोश्री अनुराधा, तर माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांच्या सूनबाई अनुराधा निवडणूक रिंगणात आहेत.

Web Title: In the foothills of the Sahara, the legacy of Fadkari!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.