संरक्षण कंपनीतील हिस्सा विक्रीला, केंद्राला मिळणार २,८६७ कोटी रुपये; शेअर्स कोसळले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 08:16 AM2023-03-24T08:16:39+5:302023-03-24T08:17:19+5:30

ही किंमत सध्याच्या बाजारभावापेक्षा ६.६ टक्क्यांनी कमी आहे.

For sale of stake in defense company, Center will get Rs 2,867 crore; Shares tumbled | संरक्षण कंपनीतील हिस्सा विक्रीला, केंद्राला मिळणार २,८६७ कोटी रुपये; शेअर्स कोसळले

संरक्षण कंपनीतील हिस्सा विक्रीला, केंद्राला मिळणार २,८६७ कोटी रुपये; शेअर्स कोसळले

googlenewsNext

नवी दिल्ली : केंद्र सरकार ऑफर फॉर सेल (ओएफएस) द्वारे एरोस्पेस आणि संरक्षण कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमधील ३.५% (११,७०३,५६३ शेअर्स) पर्यंतचा हिस्सा विकणार आहे. यासाठी फ्लोअर प्राईज २,४५० रूपये निश्चित करण्यात आली आहे.

ही किंमत सध्याच्या बाजारभावापेक्षा ६.६ टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे हिंदुस्तान एरोनॉटिक्सचे शेअर्स दोनच दिवसांत १२ टक्क्यांनी कोसळून २,५०० रुपयांवर आले आहेत. यातून सरकारला २,८६७ कोटी रुपये मिळणार आहेत.

रेग्युलेटरी फाइलिंगनुसार, ऑफर फॉर सेल किरकोळ गुंतवणूकदार नसलेल्यांना २३ मार्चला व किरकोळ गुंतवणूकदारांना २४ मार्च रोजी उघडेल. 

कंपनी काय करते ? 
एचएएल ही एरोस्पेस आणि संरक्षण कंपनी आहे. तिचे मुख्यालय बेंगळुरू येथे आहे. ही कंपनी जगातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी एरोस्पेस आणि संरक्षण उत्पादक कंपनी आहे. भारतीय हवाई दलाची दोन तृतीयांश वर्कहॉर्स विमाने एचएएलची आहेत. हलके लढाऊ विमान तेजसची निर्मितीही याच कंपनीने केली आहे.

२०१८ पासून निर्गुंतवणुकीची सुरुवात
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडची निर्गुंतवणूक २०१८ मध्ये सुरू झाली. या वर्षी एचएएलने आपला आयपीओ जारी केला होता. यानंतर, एचएएलमधील सरकारची हिस्सेदारी १०० टक्क्यांवरून ८९.९७ टक्क्यांपर्यंत खाली आली. यातून सरकारला ४,२२९ कोटी रूपये मिळाले होते.

Web Title: For sale of stake in defense company, Center will get Rs 2,867 crore; Shares tumbled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MONEYपैसा