नांदेडात युतीसाठी सेना अनुकूल

By Admin | Published: January 26, 2017 02:28 AM2017-01-26T02:28:59+5:302017-01-26T02:28:59+5:30

जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजपासोबत युती करण्यास शिवसेना अनुकूल आहे, परंतु जिल्ह्यात सेनेची ताकद अधिक असून, गरज पडल्यास स्वबळावर

Force friendly for Nanded coalition | नांदेडात युतीसाठी सेना अनुकूल

नांदेडात युतीसाठी सेना अनुकूल

googlenewsNext

नांदेड : जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजपासोबत युती करण्यास शिवसेना अनुकूल आहे, परंतु जिल्ह्यात सेनेची ताकद अधिक असून, गरज पडल्यास स्वबळावर निवडणुका लढविल्या जातील, अशी माहिती नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली़

शिवसेना आणि भाजपामध्ये युती संदर्भात बैठकांचे सत्र सुरू आहे़ या बैठकांत सकारात्मक चर्चा झाली असून, देगलूर व हदगाव वगळता अन्य ठिकाणी जागा देण्याबाबत एकमत झाले आहे़ नांदेड जिल्हा परिषदेच्या ६३ जागांपैकी किमान ३५ जागांवर सेनेचा दावा राहणार आहे़ जिल्ह्यात भाजपापेक्षा सेनेची ताकद अधिक असून, चार आमदार आमच्या पक्षाचे आहेत़
युतीबाबत आमची भूमिका अनुकूल असली, तरी प्रसंगी स्वबळाचीही आमची तयारी असल्याचे पालकमंत्री खोतकर म्हणाले़ 

Web Title: Force friendly for Nanded coalition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.