सक्तीने भूसंपादन नाही !

By Admin | Published: October 8, 2016 02:56 AM2016-10-08T02:56:17+5:302016-10-08T02:56:17+5:30

राज्यात उद्योगांची भरभराट झाली पाहिजे, तसेच रोजगारही वाढला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे.

Forced land acquisition! | सक्तीने भूसंपादन नाही !

सक्तीने भूसंपादन नाही !

googlenewsNext


माणगाव : संपूर्ण महाराष्ट्रात निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चाचे लोन रायगडमध्ये येऊन ठेपले आहे. संपूर्ण रायगड जिल्ह्याचा मराठा क्रांती मूक मोर्चा रविवारी २३ आॅक्टोबर रोजी माणगाव येथे होणार असून माणगाव मराठा समाज क्रांती समितीचे सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत.
गेले काही दिवस संपूर्ण महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने मराठा समाजाचे मूक मोर्चे निघत आहेत. त्या मोर्चात रायगडातील समस्त मराठा समाजाला सहभागी होता आले नाही. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी असलेल्या रायगडात मराठा समाजाचा मूक मोर्चा होण्याकरिता व प्रत्येक खेड्यापाड्यातील मराठ्याला सहभाग होण्यासाठी मोठ्या उत्साहाने जय्यत तयारी सुरू झाली आहे. कोपर्डी येथील अमानवी अमानुष हत्येचा निषेध, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल व मराठा आरक्षण या प्रमुख मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात मराठ्यांचे लाखोंच्या उपस्थितीचे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मूक मोर्चे निघत आहेत. सार्वजनिक मालमत्तेची हानी न करता, बाजारपेठ बंद न करता सनदशीर मार्गाने मोर्चे निघत आहेत. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात नियोजन बैठका होत आहेत.
शनिवारी ८ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वा. मानस लॉज श्रीवर्धन, दुपारी ३ वा. शासकीय विश्रामगृह म्हसळा, रविवार ९ आॅक्टोबर स.११ वा. गणेश मंगल कार्यालय, तळा तर दु. १२ वा. वीरेश्वर मंदिर सभागृह महाड, दु.३ वा. विक्र मराव मोरे सभागृह पोलादपूर, सायं ४ वा. ज्येष्ठ नागरिक सभागृह रोहा, सोमवार १० आॅक्टोबर दु.२.३० वा. ग्रामपंचायत कार्यालय निजामपूर, मंगळवार ११ आॅक्टोबर सायं.४ वा. माणगावमधील क्षत्रिय मराठा भवन येथे नियोजन सभेचे आयोजन केले आहे. मराठा समाजाच्या मोर्चासाठी संपूर्ण मराठा समाजातील ज्येष्ठ नागरिक, पुरु ष, महिला, तरु ण, तरु णी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मराठा समाज क्रांती समितीने केले आहे. (वार्ताहर)

Web Title: Forced land acquisition!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.