राज्यात परदेशी मद्य होणार आणखी स्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 04:19 AM2021-11-21T04:19:15+5:302021-11-21T04:21:48+5:30
सध्या आयात स्कॉच व्हिस्कीवर ३०० टक्के अबकारी कर आकारला जातो, यापुढे तो १५० टक्के आकारला जाईल. शुल्क कपातीमुळे या मद्याची मागणी वाढून २५० कोटी रुपयांची मिळकत राज्याला प्राप्त होईल.
मुंबई : परदेशातून आयात होणाऱ्या स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्कात ५० टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे परदेशी मद्याच्या किमतीत घट होणार आहे.
सध्या आयात स्कॉच व्हिस्कीवर ३०० टक्के अबकारी कर आकारला जातो, यापुढे तो १५० टक्के आकारला जाईल. शुल्क कपातीमुळे या मद्याची मागणी वाढून २५० कोटी रुपयांची मिळकत राज्याला प्राप्त होईल. शिवाय आयात स्कॉच व्हिस्कीची विक्री १ लाख बाटल्यांवरून २.५ लाख बाटल्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात स्कॉच व्हिस्कीचे दर अधिक असल्यामुळे तस्करीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे राज्याचा महसूल बुडत होता. शिवाय बनावट मद्याचे पेवही फुटले होते. या प्रकारांना आळा घालण्यासाठी स्कॉच व्हिस्कीचे दर इतर राज्यांसम करण्यासाठी शुल्क कपातीचा निर्णय घेतल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाशी संबंधित अधिकाऱ्याने दिली.