संमेलनाची परदेशवारी सरकारी खर्चातून नको

By admin | Published: May 1, 2015 01:06 AM2015-05-01T01:06:46+5:302015-05-01T01:06:46+5:30

साहित्य संमेलनाप्रमाणे विश्व साहित्य संमेलनासाठी शासनाने निधी देण्याची मागणी साहित्य महामंडळाने केली आहे.

The foreigners of the meeting are not required for government expenditure | संमेलनाची परदेशवारी सरकारी खर्चातून नको

संमेलनाची परदेशवारी सरकारी खर्चातून नको

Next

पुणे : साहित्य संमेलनाप्रमाणे विश्व साहित्य संमेलनासाठी शासनाने निधी देण्याची मागणी साहित्य महामंडळाने केली आहे. मात्र, विश्व साहित्य संमेलनाची परदेशवारी शासनाच्या खर्चातून करता येणार नाही. त्यासाठी बाहेरून निधी उपलब्ध करून देता येईल, असा सल्ला सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांना आज दिला.
विश्व साहित्य संमेलनासाठी दक्षिण आफ्रिकेचे निमंत्रण आले आहे. परंतु, त्यासाठी निम्मा खर्च साहित्य महामंडळाला करावा लागणार आहे. त्यामुळे २५ लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाला पाठविला आहे. गतवर्षी शासनाने निधी दिला होता. त्यामुळे भाजप-शिवसेना युतीच्या सरकारनेही निधी देण्याची मागणी केली आहे. त्याविषयी तावडे म्हणाले, की शासन परदेशवारीसाठी थेट निधी देऊ शकणार नाही. मात्र, बाहेरून निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. (प्रतिनिधी)


४मराठी सिनेमांना प्राइम टाइम मिळावा यासाठी चित्रपट निर्मात्यांनी एकत्र येऊन चर्चा करून समन्वयातून मार्ग काढावा. ज्याप्रमाणे हिंदी चित्रपट निर्माते आपआपसातील समन्वयातून चित्रपट प्रदर्शनाच्या तारखांचे नियोजन करतात. त्याप्रमाणे मराठी चित्रपट निर्मात्यांनी प्राइम टाइमविषयी भूमिका घ्यावी, असा सल्ला विनोद तावडे यांनी दिला.

 

Web Title: The foreigners of the meeting are not required for government expenditure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.