सागरी सुरक्षेला कायमच प्राधान्य - जेटली
By Admin | Published: June 8, 2014 01:33 AM2014-06-08T01:33:26+5:302014-06-08T01:33:26+5:30
गेल्या काही काळात अपघातांमुळे मलिन झालेली नौदलाची प्रतिमा सुधारण्यासाठी नवे शासन कटिबद्ध आहे.
>मुंबई : गेल्या काही काळात अपघातांमुळे मलिन झालेली नौदलाची प्रतिमा सुधारण्यासाठी नवे शासन कटिबद्ध आहे. सागरी सुरक्षेला आम्ही कायमच प्राधान्य दिले असून, यापूर्वी नौदलात घडलेल्या अपघातांची कारणमीमांसा सुरू आहे.
परदेशी थेट गुंतवणुकीत होणा:या बदलांसाठी आताच काही सांगता येणार नाही; मात्र त्यासाठी येत्या काही आठवडय़ांत सादर होणा:या अर्थसंकल्पाची वाट पाहावी लागेल, असे केंद्रीय संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. नौदलाच्या तटरक्षक दलामध्ये शनिवारी ‘अचूक’ आणि ‘अग्रिम’ या दोन नव्या गस्ती नौका दाखल झाल्या.
नौदलाच्या पश्चिम तळावर या नौकांचे उद्घाटन केंद्रीय संरक्षणमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते झाले; त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी नौदलाचे व्हॉईस अॅडमिरल अनुराग थापलियाल यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. केंद्रीय संरक्षणमंत्री जेटली यांनी या नव्या दोन नौकांचे नौदलाच्या ताफ्यात स्वागत केले. आयएनएस विक्रांतबद्दलच्या भूमिकेबाबत ते म्हणाले, विक्रांतचे प्रकरण अजूनही न्यायालयात आहे. त्यामुळे त्याविषयी कोणतीच निश्चित भूमिका मांडता येणार नाही. मात्र न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर शासन आपली भूमिका मांडेल.
त्याचप्रमाणो, 2क्16 सालार्पयत नौदलाच्या ताफ्यात 6 नव्या पाणबुडय़ा दाखल होतील, असे
जेटली यांनी सांगितले. याप्रसंगी जेटली यांनी आयएनएस विक्रांत या युद्धनौकेनंतर नौदलाची शान असणा:या आयएनएस-विराटला भेट दिली. या भेटीदरम्यान नौदलाच्या अधिका:यांसमवेत विराटची पाहणी केली. ( प्रतिनिधी)