वन विभागातील ६७५ मजुरांना कायम करणार
By Admin | Published: December 18, 2015 02:38 AM2015-12-18T02:38:35+5:302015-12-18T02:38:35+5:30
राज्यातील वन व सामाजिक वनीकरण विभागातील ६७५ वनमजुरांना वन विभागाच्या सेवेत कायम करण्याचे आश्वासन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी विधान परिषदेत
नागपूर : राज्यातील वन व सामाजिक वनीकरण विभागातील ६७५ वनमजुरांना वन विभागाच्या सेवेत कायम करण्याचे आश्वासन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी विधान परिषदेत स्थगन प्रस्ताव सूचनेच्या उत्तरात दिले.
वन विभागातील १६८१० वनमजुरांना सेवत कायम करण्यात आले आहे. ६७५ मजुरांना कायम केल्यास ३० कोटी १२ लाखांचा आर्थिक बोजा विभागावर पडणार आहे. किमान पाच वर्षे सेवेत असलेल्या वनमजुरांना सेवेत कायम करण्याबाबत सविस्तर अभ्यास करून शासनास शिफारस करण्यासाठी अप्पर प्रधान मुख्यवनसंरक्षक (नागपूर) यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती.या समितीने १ नोव्हेंबर १९९४ ते ३० जून २००४ पर्यत कार्यरत असणाऱ्या वनमजुरांना कायम करण्यात यावे, असा अहवाल दिला आहे. या अनुषंगाने पाच वर्षापेक्षा अधिक सेवा झालेल्या ६५४६ रोजंदारी मजुरांना शासन सेवेत कायम करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)