षड्यंत्र की...? मंत्री सुधीर मुनगंटीवार तेव्हा सुदैवानेच बचावले होते; दीड वर्षांनी धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 12:14 PM2023-01-07T12:14:19+5:302023-01-07T12:26:31+5:30

नागपूर एअरपोर्टला पोहचल्यानंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर हा प्रकार उघडकीस आला.

Forest Minister Sudhir Mungantiwar's car's front wheel nut bolt was loosened Revealed after a year and a half | षड्यंत्र की...? मंत्री सुधीर मुनगंटीवार तेव्हा सुदैवानेच बचावले होते; दीड वर्षांनी धक्कादायक खुलासा

षड्यंत्र की...? मंत्री सुधीर मुनगंटीवार तेव्हा सुदैवानेच बचावले होते; दीड वर्षांनी धक्कादायक खुलासा

googlenewsNext

अरुण कुमार सहाय

चंद्रपूर- विचार करा, तुमच्या चारचाकीच्या पुढील चाकाचे नट बोल्ट ढिले झालेत आणि तुम्हाला याची कल्पना नाही. याच वाहनाने तुम्ही चंद्रपूरहून नागपूर एअरपोर्ट असा प्रवास केला. पोहचल्यानंतर तुमच्या कारच्या पुढील चाकाचे सर्व नट रस्त्यात पडलेत. तर तुमची काय अवस्था असेल? ही घटना कुणा सर्वसामान्य व्यक्तीसोबत नव्हे तर राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत घडली आहे. सुदैवाने मुनगंटीवार यांच्या घटनेतून बचावलेत. 

या घटनेचा पहिल्यांदाच स्वत: सुधीर मुनगंटीवार यांनी लोकमतशी बोलताना खुलासा केला आहे. जवळपास दीड वर्षापूर्वीची ही घटना आहे. परंतु विशेष म्हणजे पोलीस अधीक्षकांना या गोष्टीची कल्पना देऊनही अद्याप या घटनेच्या मूळापर्यंत पोलीस पोहचली नाही किंवा कुणाला अटकही केली नाही. या घटनेबाबत सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, घरासमोर रात्रीच्या वेळी गाडी उभी होती. याचवेळी गाडीच्या पुढील चाकाचे नटबोल्ट कुणीतरी ढिले केले होते. सकाळी ही बाब कुणाच्या निदर्शनास आली नाही. त्यानंतर हीच कार घेऊन आम्ही नागपूर एअरपोर्टच्या दिशेने गेलो असं त्यांनी म्हटलं. 

तर नागपूर एअरपोर्टला पोहचल्यानंतर आम्हाला कारच्या पुढील चाकाचे नटबोल्ट निघाल्याचे दिसून आले. या प्रकाराबाबत आम्ही कंपनीला विचारणा केली. पुढील चाकांचे सर्व नट एकाच वेळी निघू शकतात का असं त्यांना प्रश्न केला. परंतु कंपनीने हे शक्य नाही असं म्हटलं. त्यानंतर या प्रकाराबाबत पोलीस अधीक्षक यांना माहिती देण्यात आली. परंतु त्याठिकाणी कुठलाही कॅमेरा नव्हता. त्यामुळे पोलीस कुणालाही पकडू शकली नाही असं मुनगंटीवार म्हणाले. 

दरम्यान, या घटनेनंतर आता घरासमोर कॅमेरे लावण्यात आले आहेत. हे एक षडयंत्र होते. परंतु आजपर्यंत हा कट कुणी रचला होता याचा थांगपत्ता लागला नाही. परंतु या गंभीर घटनेबाबत पोलिसांनी या प्रकरणाच्या मूळापर्यंत न पोहचणे आश्चर्यकारक आहे असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. 
 

Web Title: Forest Minister Sudhir Mungantiwar's car's front wheel nut bolt was loosened Revealed after a year and a half

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.