वनविभागात तब्बल २२०० पदे रिक्त, वन संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 02:57 AM2017-09-25T02:57:15+5:302017-09-25T02:57:21+5:30

वनविभागात राज्यातील तब्बल २२०० पदे रिक्त आहेत. यात भारतीय वनसेवेतील पाच, तसेच क्षेत्रीय वनाधिकाºयांच्याही अनेक पदांचाही समावेश आहे.

In the forest section, 2200 vacancies are vacant, forest protection question ranges | वनविभागात तब्बल २२०० पदे रिक्त, वन संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर

वनविभागात तब्बल २२०० पदे रिक्त, वन संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर

Next

गणेश वासनिक
अमरावती : वनविभागात राज्यातील तब्बल २२०० पदे रिक्त आहेत. यात भारतीय वनसेवेतील पाच, तसेच क्षेत्रीय वनाधिकाºयांच्याही अनेक पदांचाही समावेश आहे. मात्र, ही पदे भरण्यासाठी विभागीय पदोन्नती समिती पुढाकार घेत नसल्याचे दिसते.
‘मोबाइल स्क्वॉड’ या अतिमहत्त्वाच्या पथकात एकूण ५८ पदे रिक्त आहेत. वनविभागाचे राज्यात प्रादेशिक (११ वनवृत्त) तर वन्यजीव विभागाचे (९ वनवृत्त) असताना जंगल, वन्यजीवांच्या संरक्षणाची प्रमुख धुरा सांभाळणारे वनपाल, वनरक्षक आणि वन परिक्षेत्राधिकाºयांची सुमारे ९७० पदे रिक्त आहेत.

सीसीएफ (आयएफएस) ३५ पदे मंजूर असून दोन पदे रिक्त, सीएफ (आयएफएस) १८ पदे मंजूर, तर तीन पदे रिक्त, उपवनसंरक्षक (आयएफएस) १२ पदे मंजूर, तर २१ पदे रिक्त, सहायक वनसंरक्षक ३१६ पदे मंजूर असून ६२ पदे रिक्त, उपजिल्हाधिकारी (प्रतिनियुक्ती) पाच पदे मंजूर, तर एक पद रिक्त, वनअभियंता १३ पदे मंजूर असून सात पदे रिक्त, आरएफओ ९९२ पदे मंजूर असून, १५० पदे रिक्त, मंडळ अधिकारी (प्रतिनियुक्ती) पाच पदे मंजूर तर दोन पदे रिक्त

रिक्त पदांबाबत वरिष्ठ अधिकाºयांकडून आढावा घेतला जाईल. महत्त्वाची पदभरती तातडीने केली जाईल.
- सुधीर मुनगंटीवार, अर्थ व वने मंत्री

Web Title: In the forest section, 2200 vacancies are vacant, forest protection question ranges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.