तहान-भूक विसरून मदतकार्य

By admin | Published: August 8, 2014 11:25 PM2014-08-08T23:25:00+5:302014-08-08T23:25:00+5:30

सलग आठ दिवस माळीण येथे ठाण मांडून ते मदतकार्य करीत होते. पहिले तीन दिवस तर साधी झोपही मिळाली नाही.

Forget about thirsty appetite | तहान-भूक विसरून मदतकार्य

तहान-भूक विसरून मदतकार्य

Next
>मंचर : सलग आठ दिवस माळीण येथे ठाण मांडून ते मदतकार्य करीत होते. पहिले तीन दिवस तर साधी झोपही मिळाली नाही. एनडीआरएफच्या जवानांच्या बरोबरीने त्यांनी मृतदेह बाहेर काढले. शेवटचा मृतदेह हाती लागला अन् मग ते माघारी फिरले. मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मारुती बबनराव सरोदे यांनी माळीण परिसरात केलेले काम कौतुकाचा विषय ठरला आहे.
झुबकेदार मिशा असलेले मारुती सरोदे साडेपाच वर्षापासून मंचर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. मदत करण्याची त्यांना विशेष आवड असल्याने माळीण येथील मदतकार्यात त्यांनी स्वत:ला झोकून दिले. घटना घडली त्यानंतर 11 वाजता सरोदे व त्यांचे सहकारी माळीण येथे पोहोचले. त्यांना वाहतूक नियंत्रित करण्याचे काम दिले. मात्र, न राहवून ते मदतीसाठी घटनास्थळी गेले व सुन्नच झाले. सारा गाव गाडला होता. एक बांबू हातात घेऊन सरोदे यांनी शोधकार्य सुरू केले. पडलेल्या घरांर्पयत जाऊन आवाज देऊन कुणी जखमी अथवा वाचलेला आहे का, याची शहानिशा ते करीत होते. सुरुवातीस 1क् मृतदेह त्यांनी बाहेर काढले.
एका घराजवळ आवाज दिल्यावर प्रतिसाद मिळाला. त्या वेळी सरोदे व इतर तरुणांनी मायलेकराची अलगद सुटका करून त्यांना बाहेर काढले. सलग आठ दिवस सरोदे यांनी मदतकार्यात स्वत:ला झोकून दिले. एनडीआरएफच्या जवानांबरोबर ते मदत करत होते.  आठ दिवसांत 1क्क्हून अधिक मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदत केल्याचे सरोदे सांगतात. पहिले तीन दिवस तर ते झोपलेच नाहीत. मराठी शाळेच्या एका खोलीत थोडा वेळ थांबून ते परत कामाला लागत. मुलगा कपडे घेऊन आल्यावर त्यांनी कपडे बदलले. अधिका:यांनी त्यांना घरी जाण्यास सांगितले. मात्र, त्यांना स्वस्थ बसविले नाही. ते परत माघारी माळीण येथे येऊन त्यांनी कामाला सुरुवात केली. हा प्रसंग सांगताना त्यांचे डोळे भरून येतात. कर्तव्य म्हणून मी काम केले. मात्र, अशी दुर्घटना कधीही घडू नये, असे सरोदे म्हणाले.(वार्ताहर)
 
4एकदा शोध घेताना कमरेएवढय़ा गाळात सरोदे बसले होते, तर एक जवान त्यांनी दलदलीतून बाहेर काढला होता. एनडीआरएफचे जवान सरोदे यांच्या कामाचे कौतुक करीत होते. सरोदे संध्याकाळी थोडासा भात खाऊन व एखादा चहा पिऊन नेटाने बचावकार्य करीत होते. त्यांच्या पायांतील बूट फाटले आहेत. पायाला खूप सा:या जखमा झाल्याने त्यांना चालताही येत नाही. आजही त्या जखमा ताज्या आहेत. जवानांना मृतदेह नेऊ लागणो व मार्गदर्शन करण्याचे काम त्यांनी ठामपणो केले. मदतकार्य संपण्यापूर्वी एका वृद्धेचा मृतदेह व एक अवयव सापडला, त्याचे साक्षीदार सरोदे होते. एनडीआरएफची टीम काम संपवून बाहेर पडली, तेव्हा सरोदे घरी निघाले.

Web Title: Forget about thirsty appetite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.