जिल्हा परिषद शाळेचे रूप पालटले
By Admin | Published: March 3, 2017 01:25 AM2017-03-03T01:25:27+5:302017-03-03T01:25:27+5:30
हातवळण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील रूप पालटलेले आहे.
वरवंड : हातवळण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील रूप पालटलेले आहे. जिल्हा परिषद शाळा आदर्श ठरत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. इंग्लिश मीडियम शाळेतून विद्यार्थी येऊन जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेत आहेत. इंग्लिश मीडियम शाळेच्या पावलावर पाऊ ल ठेवत जिल्हा परिषद शाळा हायटेक होताना
दिसत आहे.
लोकांचा असा समज असायचा, की जिल्हा परिषद शाळा म्हणजे जुन्या पडक्या खोल्या अशा स्वरूप असणाऱ्या शाळा तसेच रंग नसलेली भिंत असे चित्र लोकांसमोर उभे राहायचे, मात्र हातवळण येथील हा जिल्हा परिषद शाळेचा चेहरा बदलण्याचे काम येथील ग्रामस्थांनी मिळून केले आहे.
तसेच शाळेतील १ ली ते ७ वीच्या विद्यार्थ्यांचे संविधान तोंडपाठ आहे. तसेच विद्यार्थ्यांना इग्रजी माध्यमाप्रमाणे ड्रेसही देण्यात आला आहे.
हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा बदल करण्यामागे गावातील लोकांचा मोठा सहभाग पाहावयास मिळत आहे. यामुळे लोकांनी दाखवलेला सहभाग या शाळेला नवे रूप देण्यास यशस्वी झाले आहे. याचबरोबर या हातवळण येथील ग्रामस्थांनी शाळेसाठी आर्थिक योगदान दिले आहे.
या शाळेमध्ये वेळोवेळी केंद्रप्रमुख वसंत कुतवळण यांचे मार्गदर्शन मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. या शाळेसाठी सरपंच चैताली बनकर, उपसरपंच रमेश जगताप, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सागर फडके, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य मंगेश फडके, दशरथ सरडे, मयूर फडके, चंद्रकांत शितोळे, हातवळण ग्रामपंचायत व शिक्षक सोमनाथ बडे, नराळे, संकपाळ, घोरपडे यांनी वेळोवेळी प्रयत्न केले आहेत.
(वार्ताहर)
>या ग्रामस्थांनी शाळेसाठी शाळेतील वर्गखोलीतील फरशी, पाणी पिण्यासाठी पाण्याचे जार, साहित्य ठेवण्यासाठी कपाट, क्रीडासाहित्य, पुस्तके, तसेच रंगकामासाठी चौदाव्या वित्त आयोगातून आर्थिक मदत, तसेच कमी पडलेल्या निधीसाठी रंगकामासाठी लोकवर्गणीतून काम पूर्णत्वाकडे जाताना दिसत आहे,
स्पीकर्स, प्रिटंर, शाळेतील मैदानामध्ये सुशोभीकरण केले आहे. तसेच शाळेमध्ये बाग व त्याचे सुशोभीकरण करणे, क्रीडांगण, प्रत्येक वर्गात प्रोजेक्टर करण्याचा मानस असल्याचे मुख्याध्यापक वसंत भोसले यांनी सांगितले. तसेच शाळा सिद्धी योजनेअंतर्गत ‘अ’ दर्जा प्राप्त करण्याचे उद्दिष्ट आहे.