पालिकांच्या प्रारूप मतदार याद्यांची २७ ला प्रसिद्धी

By admin | Published: February 20, 2017 03:30 AM2017-02-20T03:30:27+5:302017-02-20T03:30:27+5:30

भिवंडी- निजामपूर, मालेगाव, परभणी, लातूर, चंद्रपूर आणि पनवेल या सहा महानगरपालिकांच्या प्रारूप मतदार याद्यांची २७ फेब्रुवारीला

The format of the corporation is popularized in 27 of the voters lists | पालिकांच्या प्रारूप मतदार याद्यांची २७ ला प्रसिद्धी

पालिकांच्या प्रारूप मतदार याद्यांची २७ ला प्रसिद्धी

Next

मुंबई : भिवंडी- निजामपूर, मालेगाव, परभणी, लातूर, चंद्रपूर आणि पनवेल या सहा महानगरपालिकांच्या प्रारूप मतदार याद्यांची २७ फेब्रुवारीला प्रसिद्धी झाल्यानंतर त्यावर ४ मार्चपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी रविवारी येथे दिली.
सहारिया यांनी सांगितले की, भिवंडी-निजामपूर, मालेगाव, परभणी, लातूर आणि चंद्रपूर या पाच महानगरपालिकांसह नवनिर्मित पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी मतदार यादीचा कार्यक्र म जाहीर करण्यात आला आहे. ५ जानेवारीला प्रसिद्ध झालेली विधानसभेची मतदार यादी या महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी ग्राह्य धरली जाणार आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या २७ फेब्रुवारीला प्रसिद्ध होतील. तेव्हापासून ४ मार्चपर्यंत या याद्यांवर हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर १० मार्चला अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध होतील.
भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०१७ या अर्हता दिनांकावर आधारित विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी ५ जानेवारीला प्रसिद्ध केली आहे. तीच यादी या निवडणुकांसाठी वापरली जाणार आहे.
प्रभागनिहाय यादीत नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे, नावांत अथवा पत्त्यांत दुरुस्त्या करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही; परंतु विधानसभेच्या मतदार यादीचे प्रभागनिहाय विभाजन करताना झालेल्या चुका, प्रभाग बदल अथवा विधानसभेच्या यादीत नाव असतानाही प्रभागाच्या मतदार यादीतून वगळले गेले, अशा स्वरूपाच्या दुरुस्त्या
आक्षेप व सूचनांच्या आधारे केल्या जातील, असेही सहारिया म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: The format of the corporation is popularized in 27 of the voters lists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.